श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण, कोणतेही काम होऊ शकत नाही: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 03:42 PM2021-03-17T15:42:05+5:302021-03-17T15:44:10+5:30

assam assembly election 2021: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) आसाम दौऱ्यावर असून, गुवाहाटी आणि होजाई येथे त्यांनी रॅलीला संबोधित केले.

assam assembly election 2021 yogi adityanath says feeling glad to hear jay shri ram in assam | श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण, कोणतेही काम होऊ शकत नाही: योगी आदित्यनाथ

श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण, कोणतेही काम होऊ शकत नाही: योगी आदित्यनाथ

Next
ठळक मुद्देयोगी आदित्यनाथ आसाम दौऱ्यावरश्रीरामांशिवाय भारत अपूर्ण - योगीकामाख्या मंदिरात जय श्रीराम ऐकून बरे वाटले - योगी

गुवाहाटी: आसाम विधानसभा निवडणुकांच्या (assam assembly election 2021) पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून (BJP) सत्ता टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाते आहेत. भाजपचे मुख्यमंत्री, नेते, मंत्री विविध राज्यांतील प्रचार मोहिमांमध्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) आसाम दौऱ्यावर असून, गुवाहाटी आणि होजाई येथे त्यांनी रॅलीला संबोधित केले. श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. (assam assembly election 2021 yogi adityanath says feeling glad to hear jay shri ram in assam)

गुवाहाटी येथील रॅलीच्या आधी योगी आदित्यनाथ यांनी कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. कामाख्या मंदिरात जय श्रीराम अशा घोषणा ऐकून आनंद झाला, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रीराम मंदिराचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येईल. श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण आहे. श्रीरामाशिवाय भारतातील कामकाज सुरू राहू शकत नाही, असेही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

...तर कोरोनाला रोखणे कठीण होईल, चाचण्या वाढवल्या पाहिजेत; पंतप्रधान मोदींच्या सूचना

काँग्रेसवर सोडले टीकास्त्र

योगी आदित्यानाथ यांनी रॅलीत जनतेला संबोधित करताना काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करत आला आहे. त्यांनी ईशान्य भारतातील राज्यांकडे कधी लक्ष दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. आसाममधील सरकार समृद्धी आणणारे सरकार असेल. पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवले. आता तर आसाममधील नागरिकही जम्मू-काश्मीरमध्ये जाऊ शकतो, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

दरम्यान, केवळ भाजप असा पक्ष आहे, जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो, काम करत असतो. काँग्रेसने कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तो सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे, अशी टीका करत विधानसभा निवडणुकीत भाजपला मत द्या, असे आवाहन स्मृति इराणी यांनी केले. आसाममध्ये अनेक बडे काँग्रेस नेते होऊन गेले. त्यातील पंतप्रधानही झाले. मात्र, राज्याचा विकास, गरिबांचे कल्याण झाले नाही. केवळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात आसाममध्ये एम्स उभे राहिले, असे इराणी यांनी नमूद केले. 

Web Title: assam assembly election 2021 yogi adityanath says feeling glad to hear jay shri ram in assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.