शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये विषारी दारूमुळे 69 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 12:24 IST

आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 69 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 69 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच दारूचे नमूने घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

गुवाहाटी - आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 69 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (21 फेब्रुवारी) दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडले होते. दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विषारी दारू प्यायल्याने अनेकांची अचानक तब्येत बिघडली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना 69 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच दारूचे नमूने घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. विषारी दारू ही शहराच्या बाहेरून आणली होती. ही दारू उत्पादन शुल्काच्याच काही कर्मचार्‍यांनी आणल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रशासनाने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

विषारी दारूमुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये 92 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारू प्यायल्याने याआधी तब्बल 92 जणांचा मृत्यू झाला आहे. सहारनपूरमध्ये 64, रुरकीमध्ये 20 आणि कुशीनगरमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. सहारनपूरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 जणांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यातील 36 जणांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. विषारी दारूमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सहारनपूरच्या 18 लोकांचा उपचारादरम्यान मेरठमध्ये मृत्यू झाला होता. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करू असे प्रशासनाने सांगितले आहे. याप्रकरणी विविध ठिकाणी छापे मारुन आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली असून बेकायदा दारू मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली होती.

उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांनी सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली आणि बेकायदेशीर दारू विक्री विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. तर उपचारासाठी रुग्णालयात दाखल असणाऱ्या व्यक्तींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा केली. तसेच याप्रकरणी अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. 

टॅग्स :AssamआसामDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक