शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये अस्मिता पदयात्रा

By admin | Updated: August 6, 2016 03:51 IST

यापुढे मृत जनावरांची कातडी कमावणार नाही, अत्याचार सहन करणार नाही

अहमदाबाद : यापुढे मृत जनावरांची कातडी कमावणार नाही, अत्याचार सहन करणार नाही, अशा घोषणा देत, उनामध्ये चार दलितांना गोरक्षणाच्या नावाखाली झालेल्या बेदम मारहाणीच्या निषेधार्थ गुजरातमधील दलितांनी शुक्रवारपासून अहमदाबादच्या वेजलपूर भागातून पदयात्रा सुरू केली.ही दलित अस्मिता यात्रा १५ आॅगस्ट रोजी उना गावात पोहोचणार आहे. पदयात्रेतील सर्व जण आणि उना गावातील दलित त्या ठिकाणी ध्वजवंदन करून, स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत.ही पदयात्रा आज सुरू झाली, तेव्हा त्यात हजारो लाक सहभागी झाले. त्यातील ८00 लोक १0 दिवसांच्या काळात ३५0 किलोमीटर अंतर चालणार असून, मधल्या गावांतील लोकही त्यात सहभागी होणार आहेत. हजारो वर्षांपासूनच्या रूढी आणि परंपरा तोडण्यासाठी जनजागृती करणे हा या अस्मिता यात्रेचा उद्देश आहे. प्रत्येक गावांमध्ये आम्ही सभा घेणार आहोत. यापुढे मृत जनावरांची कातडी काढण्याचे आणि मैला उचलण्याचे, तसेच शौचालयांच्या सफाईचे काम दलितांनी बंद करावे, असे आमचे प्रयत्न असून, त्यासाठी प्रत्येक गावातील दलितांना सांगण्यात येईल, असे या पदयात्रेचे संघटक जीग्नेश मेवाणी यांनी सांगितले.यापुढे आम्ही म्हणजे दलित कोणताही अन्याय आणि अत्याचार सहन करणार नाही, असा इशारा देणे हा आमचा हेतू असून, या निमित्ताने राज्यातील दलितांना आम्ही एकत्र आणणार आहोत. आम्ही आमची परंपरागत कामे यापुढे करणार नसल्याने आम्हाला शेतीसाठी जमीन देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे मेवाणी म्हणाले.माजी आयपीएस अधिकारी राहुल शर्मा यांनी दलित अस्मिता पदयात्रेची कल्पना सुचवली आणि सर्व दलित तसेच पुरोगामी संघटनांनी ती मान्य केली. या यात्रेत राहुल शर्माही सहभागी झाले आहेत. अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांचाही त्यात सहभाग आहे. (वृत्तसंस्था)>गीर सोमनाथ जिल्ह्यातील उना गावात ११ जुलै रोजी चार दलितांना बेदम मारहाण करण्यात आली होती. मृत गायीचे कातडे काढण्याचे ते काम करीत होते. पण तुम्हीच गायीला मारले, असा आरोप करीत गोरक्षकांनी त्यांची रस्त्यावरून धिंड काढत मारहाण केली होती. त्यामुळे गुजरातमधील दलितांमध्ये प्रचंड संताप आहे. काही दिवसांपूर्वी या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात चार दलित तरुणांनी विषप्राशन केले होते. त्यातील एक जण मरण पावल्यामुळे संतापात भरच पडली.>या दोन घटनांनंतर गुजरात सरकारही अडचणीत आले. त्यानंतर आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार असताना दलितांना झालेली मारहाण, त्यांचे सुरू झालेले आंदोलन यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये अस्वस्थता आहे.