शहरात ३१६ ठिकाणी उघड्यावर मांसविक्री मनपाकडून सर्व्हे : नियमावलीबाबत मार्गदर्शन मागविले

By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:35+5:302016-04-26T00:16:35+5:30

नाशिक : महापालिकेने हॉकर्स झोनचा आराखडा निश्चित करतानाच शहरात उघड्यावर मांसविक्री करणार्‍या विक्रेत्यांचाही सर्व्हे केला असून, त्यात ३१६ ठिकाणी मांसविक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, मांसविक्रीबाबत नियमावली तयार करण्यासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून, विक्रेत्यांना बंदिस्त स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

Asked for guidance on surveys: Manual from 316 places in the city | शहरात ३१६ ठिकाणी उघड्यावर मांसविक्री मनपाकडून सर्व्हे : नियमावलीबाबत मार्गदर्शन मागविले

शहरात ३१६ ठिकाणी उघड्यावर मांसविक्री मनपाकडून सर्व्हे : नियमावलीबाबत मार्गदर्शन मागविले

शिक : महापालिकेने हॉकर्स झोनचा आराखडा निश्चित करतानाच शहरात उघड्यावर मांसविक्री करणार्‍या विक्रेत्यांचाही सर्व्हे केला असून, त्यात ३१६ ठिकाणी मांसविक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, मांसविक्रीबाबत नियमावली तयार करण्यासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून, विक्रेत्यांना बंदिस्त स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
महापालिकेने हॉकर्स झोनचा आराखडा तयार केला असून, सुमारे साडेनऊ हजार फेरीवाल्यांना त्यांच्या हक्काच्या जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सदर आराखड्याला अद्याप महासभेकडून मंजुरी मिळालेली नाही. महासभेने गटनेत्यांच्या बैठकीत सदर हॉकर्स झोनवर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय जाहीर केला आहे, परंतु अद्याप गटनेत्यांच्या बैठकीला मुहूर्त लाभू शकलेला नाही. दरम्यान, महापालिकेने शहरात उघड्यावर मांसविक्री करणार्‍या विक्रेत्यांचाही सर्व्हे केला असून, संबंधित विक्रेत्यांना बंदिस्त स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. महापालिकेने विभागनिहाय सर्वेक्षण केले आहे. त्यात नाशिक पूर्व विभागात ७१, नाशिक पश्चिममध्ये ९, पंचवटी विभागात ८८, नाशिकरोड भागात ३६, सिडको विभागात २६, तर सातपूर विभागात ८६ मांसविक्रेते उघड्यावर व्यवसाय करताना निदर्शनास आले आहे. उघड्यावर मांसविक्रीबाबत नागरिकांच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे सदर विक्रेत्यांना विभागनिहाय बंदिस्त जागा उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Asked for guidance on surveys: Manual from 316 places in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.