शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

कुणी 'INDIA' ला तर कुणी 'भारता'ला दिल्या शुभेच्छा; आशिया कपनंतर राजकीय बॅटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 21:35 IST

आशिया चषकात भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final : आशिया चषक 2023 मध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचे खेळाडू 15.2 षटकांत अवघ्या 50 धावावंर ऑलआउट झाले. प्रत्युत्तरात सलामीवीर इशान किशन(23) आणि शुभमन गिल(27) अवग्या 6.1 षटकांत सामना जिंकून दिला. या विजयानंतर भारतीय संघाचे देशभरातून कौतुक होत आहे. पण, या कौतुकात 'भारत विरुद्ध इंडिया' पॅटर्न पाहायला मिळत आहे. 

भारताच्या विजयानंतर काही नेते भारताचे विजयाबद्दल अभिनंदन करत आहेत, तर काही नेते इंडियाचे अभिनंदन करत आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी संघाचे अभिनंदन करताना इंडिया शब्दाचा वापर केला. 

सीएम केजरीवालांचे ट्विट

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही टीमचे अभिनंदन करताना INDIA हा शब्द वापरला आहे. 

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथयांनी मात्र भारत हा शब्द वापरुन भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. 

संघाचे अभिनंदन करण्यासाठी भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान मोदींचा फोटो वापरला आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी 'भारताचे' अभिनंदन केले

काय आहे भारत विरुद्ध इंडियावाद?हा संपूर्ण वाद G-20 च्या डिनरच्या निमंत्रणावरुन सुरू झाला. G-20 शिखर परिषदेच्या डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवर 'President of India' ऐवजी 'President of Bharat' असे लिहिले होते. निमंत्रण पत्र बाहेर आल्यानंतर मोदी सरकार देशाच्या नावात इंडिया हा शब्द वापरणे बंद करून केवळ भारत म्हणण्याचा डाव आखत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. इंडियाचे नाव बदलून भारत व्हावे, यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

वादाची सुरुवात बंगळुरुपासून विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीला I.N.D.I.A नाव दिल्यानंतर हा वाद सुरू झाला. यामुळेच सत्ताधारी पक्ष देशाचे नाव बदलण्याचा कट रचत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. 17-18 जुलै रोजी बंगळुरू येथे विरोधी पक्षांची बैठक झाली. 26 विरोधी पक्षांनी भाजप सरकारच्या विरोधात एकत्र येऊन त्यांच्या आघाडीचे नाव इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (इंडिया) असे जाहीर केले होते. या घोषणेनंतर भाजपने इंडिया, हे इंग्रजांनी दिलेल्या गुलामगिरीचे नाव असल्याचे म्हणत, विरोधकांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. 

 

टॅग्स :asia cupएशिया कप 2023BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादव