शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

Ashwini Vaishnaw : रामायण एक्सप्रेससारखी कुराण, बायबल एक्सप्रेस धावणार का? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं असं उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 9:41 PM

Ashwini Vaishnaw : प्रभू श्रीरामावर श्रद्धा असलेल्या भाविकांसाठी भारतीय रेल्वेने रामायण यात्रा एक्सप्रेस चालवली आहे

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात प्रभू श्रीरामावर श्रद्धा असलेल्या भाविकांसाठी भारतीय रेल्वेनेरामायण यात्रा एक्सप्रेस सुरू केली आहे. याच पार्श्वभमीवर रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांना एक सवाल करण्यात आला. याचे उत्तरही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टपणे दिले आहे. रामायण एक्सप्रेसप्रमाणेच बायबल, कुराण एक्सप्रेस, गुरुग्रंथ एक्सप्रेसही देशात धावू शकतात का? असा सवाल अश्विनी वैष्णव यांना करण्यात आला होता. यावर रामायण एक्सप्रेस ही फक्त सुरुवात आहे, भविष्यात काहीही होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

आजतकच्या एका कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे सहभागी झाले होते. यावेळी जगातील इतर देश छोट्या-छोट्या गोष्टी अशा प्रकारे दाखवतात, जणू काही मोठी गोष्ट आहे, त्याला मोठा इतिहास आहे. आपल्या इथे खूप वारसा आहे. आमचे किल्ले, सफारी, आयुर्वेद, मग ते लोकांना दाखवू नये का? असे ते म्हणाले. तसेच, बायबल, कुराण, गुरुग्रंथ एक्सप्रेस रामायण एक्सप्रेसप्रमाणे धावतील का? या प्रश्नावर ते म्हणाले की, रामायण एक्सप्रेस ही फक्त सुरुवात आहे, भविष्यात काहीही होऊ शकते. भारताचे अनेक पैलू आहेत, प्रत्येक पैलूवर ट्रेन बनू शकते. या सर्व गोष्टींमध्ये लोक खूप रस घेत आहेत. 

याचबरोबर, ते म्हणाले की, प्रत्येक शहराची वेगळी संस्कृती असते. स्टेशन शहराच्या संस्कृतीशी जुळले पाहिजे. प्रवाशांचा अनुभव चांगला असायला हवा, हे ध्यानात घेऊन तयार करण्यात येत आहे. आम्ही 40 मॉडेल स्टेशन तयार करत आहोत. यात राजकारण नाही. पुढील दोन ते तीन वर्षांत अशी 250-300 स्थानके बांधली जातील. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला सांगितले आहे की, अशा प्रकारे रेल्वे स्टेशनचा विस्तार व्हावा की पुढील 50 वर्षे टिकले पाहिजे. पुढील दोन तीन वर्षांत अडीचशे ते तीनशे रेल्वे स्थानकांचा कायापालट होईल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

खासगीकरण होणार की नाही...सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाच्या प्रश्नावर रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, रेल्वेला खासगी हातांमध्ये सोपविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रेल्वेचे कधीही खासगीकरण केले जाणार नाही. जगभरातील रेल्वे सरकार चालवितात, इथेही सरकारच रेल्वे चालवेल असे अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. 

रामायण एक्सप्रेस 7 नोव्हेंबरपासून सुरूप्रभू श्रीरामावर श्रद्धा असलेल्या भाविकांसाठी भारतीय रेल्वेने रामायण यात्रा एक्सप्रेस चालवली आहे. IRCTC ने धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी 'देखो अपना देश' या उपक्रमांतर्गत ही डीलक्स एसी टुरिस्ट एक्सप्रेस सुरू केली आहे. रामायण एक्सप्रेस ही 7 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. ही एक्सप्रेस प्रभू श्रीरामाशी संबंधित सर्व ठिकाणी फिरेल. 'देखो अपना देश' अंतर्गत या विशेष एक्सप्रेसचा प्रवास अयोध्या, सीतामढी, काशी, प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूट, नाशिक आणि नंतर प्राचीन किष्किंदा शहर हंपी येथील मंदिराना भेट देईल.

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवramayanरामायणrailwayरेल्वे