आशुतोष शर्मा यांचं वीरमरण देशाची मोठी हानी, ५ वर्षात पहिल्यांदाच सैन्यानं 'कर्नल' गमावला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 05:50 PM2020-05-03T17:50:08+5:302020-05-03T17:50:58+5:30

जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लश्कर-ए-तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटचा प्रयत्न आहे.

Ashutosh Sharma's heroic death a great loss to the country, for the first time in 5 years, the army lost a 'colonel' in jammu and kashmir handwada encounter MMG | आशुतोष शर्मा यांचं वीरमरण देशाची मोठी हानी, ५ वर्षात पहिल्यांदाच सैन्यानं 'कर्नल' गमावला

आशुतोष शर्मा यांचं वीरमरण देशाची मोठी हानी, ५ वर्षात पहिल्यांदाच सैन्यानं 'कर्नल' गमावला

Next

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. लष्कर ए तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यात लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवानांना हौतात्म्य आले. त्यामध्ये भारतीय सैन्याने कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याला गमावले. गेल्या ५ वर्षात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याला वीरमरण प्राप्त झाले आहे. कर्नल आशुतोष शर्मा, असे या जिगरबाज अधिकाऱ्याचे नाव आहे. 

जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लश्कर-ए-तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटचा प्रयत्न आहे. वर्चस्वाच्या या लढाईतूनच टीआरएफने शनिवारी रात्री उशिरा हा हल्ला केला. त्यांनी या हल्ल्याची जबाबदारीही घेतली आहे. दहशतवादी आणि भारतीय सैन्याच्या या लढाईत सैन्यातील ५ जवानांना वीरमरण प्राप्त झाले. चांजमुल्ला भागात शनिवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक कर्नल, एक मेजर, लष्कराचे दोन जवान आणि एक पोलीस उपनिरीक्षकाला हौतात्म्य आले. यातील कर्नल आशुतोष शर्मा यांनी यापूर्वी दहशतवाद्यांविरोधातील अनेक कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. मात्र, या कारवाईत त्यांना हौतात्म्य आले.

२१ राष्ट्रीय रायफल युनिटचे नेतृत्व सांभाळणाऱ्या कर्नल आशुतोष यांना दोनवेळा वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. काऊंटर टेरिजस्म ऑपरेशनमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते. गार्ड्स रेजिमेंटमधून येणारे कर्नल शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर खोऱ्यात कर्तव्यावर होते. शर्मा यांना त्यांच्या शौर्याबद्दल सेना मेडलनेही गौरिवण्यात आले होते. कर्नल शर्मा जेव्हा कमांड ऑफिसर होते, तेव्हा एका दहशतवाद्याने आपल्या कपड्यांमध्ये ग्रेनेट लपवून आणले होते. शर्मा यांनी क्लोज रेंजमधून त्यास गोळी मारुन ठार केले. शर्मा यांच्या या चाणाक्ष्यपणा आणि प्रसंगावधानतेमुळे साथी जवाना आणि जम्मू काश्मीरमधील पोलीसांचा जीव वाचला होता. 

कर्नल शर्मा यांना आलेलं वीरमरण हे भारतीय सैन्याची मोठी हानी आहे. काश्मीर खोऱ्यात एवढ्या उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यास ५ वर्षापूर्वी वीरमरण आले होते. जानेवारी २०१५ मध्ये एका ऑपरेशनमध्ये कर्नल एमएन रॉय शहीद झाले होते. त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात कर्नल संतोष महाडिक यांनाही वीरमरण प्राप्त झाले होते. त्यानंतर, ५ वर्षांनी भारतीय सैन्याने एवढ्या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यास गमावले आहे. त्यामुळेच, कर्नल शर्मा यांचे वीरमरण सैन्याची, देशाची मोठी हानी आहे. 

दरम्यान, उत्तर-काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडाच्या चांजमुल्ला भागात शनिवारी एका घरात लपलेल्या काही दहशतवाद्यांनी नागरिकांना बंधक बनवले होते. मिळेलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या एका तुकडीने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने या भागाला घेरले आणि सर्व नागरिकांना सोडवले. जेव्हा बंधक नागरिकांना सोडवण्यात येत होते. तेव्हाच दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला. यानंतर लष्करानेही प्रत्युत्तर दिले. यात लष्कराचे अधिकारी कर्नल आशुतोष शर्मा आणि मेजर अनूज यांच्यासह दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीसचे उपनिरीक्षक शकील काझी यांना हौतात्म्य आले.
 

Web Title: Ashutosh Sharma's heroic death a great loss to the country, for the first time in 5 years, the army lost a 'colonel' in jammu and kashmir handwada encounter MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.