शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

Uttar Pradesh Assembly Election: आयपीएस असीम अरुण, सपाचे २ आमदार भाजपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 6:17 AM

ईडीचे माजी अधिकारी राजेश्वर सिंह यांचाही होणार प्रवेश

- राजेंद्र कुमारनवी दिल्ली : नोकरदार आणि राजकारण यांचे नाते तसे जुने आहे. नोकरीत असताना नेत्यांचे डोळे, कान आणि नाक हे अधिकारीच असतात. आता तर राजकारणातही माजी अधिकाऱ्यांचा दबदबा वाढला आहे. कानपूरचे पहिले पोलीस आयुक्त राहिलेले आयपीएस अधिकारी असीम अरुण हे रविवारी भाजपमध्ये दाखल झाले. प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत ते पक्षात दाखल झाले. ईडीचे संयुक्त संचालक राहिलेले राजेश्वर सिंह हेही लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. याशिवाय, समाजवादी पार्टीचे दोन विधान परिषद सदस्य शैलेंद्र प्रताप सिंह आणि घनश्याम लोधी, माजी आमदार ओमप्रकाश वर्मा व माजी आयएएस अधिकारी राम बहादूर यांनीही रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. असीम अरुण यांनी गत ८ जानेवारी रोजी व्हीआरएससाठी अर्ज दिलेला आहे. राज्य सरकारने १५ जानेवारी रोजीच हा अर्ज स्वीकार केला. १९९४ च्या बॅचचे आयपीएस असीम अरुण यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज देताना सांगितले होते की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सांगण्यावरून आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. असीम यांचे वडील श्रीराम अरुण हे डीजीपी होते. असीम यांच्या नोकरीचे सात वर्षे अद्याप बाकी आहेत. तेही वडिलांप्रमाणे डीजीपी बनले असते. भाजपा कन्नोजमधून त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकते.  नोकरदारांचे भाजप प्रेम आहे जुने ज्येष्ठ पत्रकार गिरीश पांडेय यांनी सांगितले की, देशात आणि राज्यात नोकरदार आणि भाजपा यांचे प्रेम तसे जुने आहे. जनसंघाच्या काळापासून हे चालत आलेले आहे. १९६७ मध्ये फैजाबादेत जिल्हाधिकारी राहिलेले के. के. नायर हे जनसंघाच्या तिकिटावर बहराइचमधून लोकसभेत पोहोचले होते. डीजीपी राहिलेले श्रीशचंद्र दीक्षित अगोदर भाजपमध्ये आले. नंतर विहिंपमध्ये गेले. राम मंदिर आंदोलनातही ते होते. विहिंपचे नेते अशोक सिंघल यांचे भाऊ बी. पी. सिंघल, डीजीपी राहिलेले राज्यसभा सदस्य ब्रजलाल, निवृत्त आयपीएस सूर्यकुमार शुक्ला, निवृत्त आयएएस व विधान परिषद सदस्य अरविंद कुमार शर्मा, माजी रेल्वे अधिकारी आमदार देवमणी, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासारखे अनेक नेते भाजपमध्ये आहेत. पांडेय म्हणतात की, भाजपचे नेतृत्व नोकरदारांवर खूप विश्वास ठेवत आलेले आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा