शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:47 IST

Asaduddin Owaisi on all-party meeting: केंद्र सरकारने आज (24 एप्रिल) पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

Asaduddin Owaisi on all-party meeting:जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज (24 एप्रिल) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. या बैठकीला सर्व पक्षांच्या नेत्यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल माहिती दिली जाईल आणि त्यांचे मत जाणून घेतले जातील. दरम्यान, एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी या बैठकीला आमंत्रित न केल्यामुळे नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले ओवेसी ?असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, पहलगाम हल्ल्यावर होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीबद्दल त्यांनी काल रात्री किरण रिजिजू यांच्याशी चर्चा केली. रिजिजू म्हणाले की, ज्या पक्षांचे 5 किंवा 10 खासदार आहेत, त्यांनाच बोलावण्यात येणार आहे. मी रिजिजूंना विचारले की, कमी खासदार असलेल्या पक्षांना का बोलावले जात नाही? त्यावर ते बैठक खूप लांबेल. मग मी त्यांना म्हणाले, मग आमचे काय?, तर रिजिजू गमतीने म्हणाले, तुमचा आवाज खूप मोठा आहे.

ओवेसी पुढे म्हणतात, ही भाजप किंवा कोणत्याही एका पक्षाची बैठक नाही, तर ही सर्वपक्षीय बैठक आहे. याचा उद्देश दहशतवाद आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांविरुद्ध एकजूट आणि मजबूत संदेश देणे आहे. पंतप्रधान मोदी सर्व पक्षांचे म्हणणे ऐकण्यासाठी एक तास जास्त देऊ शकत नाहीत का? एखाद्या पक्षाचा 1 खासदार असोत किंवा 100, ते सर्व भारतीय जनतेने निवडून दिलेले असतात आणि इतक्या मोठ्या मुद्द्यावर प्रत्येकाचे म्हणणे ऐकले पाहिजे, असे मत ओवेसींनी व्यक्त केले.

ओवेसींची पंतप्रधान मोदींना विनंतीओवेसी पुढे म्हणाले, हा राजकीय मुद्दा नाही, तर देशाशी संबंधित एक मोठा मुद्दा आहे. म्हणून प्रत्येक पक्षाचे विचार ऐकले पाहिजेत. पंतप्रधान मोदींना विनंती करतो की, त्यांनी ही बैठक खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय बैठक बनवावी. ज्या पक्षांचे खासदार संसदेत आहेत, त्या सर्व पक्षांना या बैठकीला बोलावले पाहिजे.

सर्वपक्षीय बैठक कधी बोलावली जाते?बुधवारी सर्व पक्षांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाहा यांनी वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा केली. जेव्हा देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो, तेव्हा सरकार सर्व राजकीय पक्षांना एकत्र बोलावते आणि चर्चा करते. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर किंवा 2020 मध्ये भारत-चीन तणावादरम्यान अशाप्रकारची बैठक बोलवण्यात आली होती. अशा बैठकांचा उद्देश देशाची एकता दर्शविणे आणि सर्व नेते एकत्र येऊन तोडगा काढण्यासाठी चर्चा करणे हा आहे. यासोबतच, विरोधी पक्षाला सरकारला आपले प्रश्न विचारण्याची आणि संपूर्ण माहिती मिळवण्याची संधी मिळते.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाcongressकाँग्रेस