शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

“पंतप्रधान मोदी असे हुकुमशहा, ज्यांना फक्त कौतुक ऐकायचे असते; सत्य आणि टीका नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:48 IST

वाढती बेरोजगारी, महागाई असे अजून कटू सत्य देखील पंतप्रधान ऐकतील, अशी आशा आहे.

नवी दिल्ली: शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर सुरु होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (PM Narendra Modi) माझी भेट झाली तेव्हा ते खूप अहंकारात होते. ५ मिनिटांत माझ्यात आणि त्यांच्यात वाद झाला.  ते खूप गर्विष्ठ आहेत. जेव्हा मी त्यांना सांगितले आमचे ५०० जण मृत्यू पावलेत तेव्हा माझ्यासाठी मेलेत का? असा प्रश्न त्यांनी केला, असे खळबळजनक विधान मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. यावरून विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. यातच आता एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही टीका केली असून, पंतप्रधान मोदी असे हुकुमशाह आहेत, ज्यांना सत्य आणि टीका ऐकायची नसते, असे म्हटले आहे. 

सत्यपाल मलिक एका राज्यपाल आहेत. केंद्र सरकराने मलिकांची नियुक्ती केली आहे. इतकेच नव्हे तर ते एका घटनात्मक पदावर आहेत. मी काय सांगतो त्यावर तुमचा विश्वास बसत नाही, पण किमान राज्यपाल काय सांगतात, त्यावर तरी विश्वास ठेवा. राज्यपाल स्वत: सांगत आहेत की पंतप्रधान सत्य ऐकायला तयार नव्हते, असे ओवेसी म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

...त्यांना सत्य आणि टीका ऐकायची नसते

राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधानांना सांगितले की शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान तुमच्यामुळे शेतकरी मरण पावले, तेव्हा पंतप्रधान संतप्त झाले. यावरून हे सिद्ध होते की पंतप्रधान सत्य स्वीकारायला तयार नाहीत. यातून पंतप्रधानांचा अहंकार दिसून येतो. ते असे हुकुमशहा आहेत, ज्याला फक्त कौतुक ऐकायचे आहे. ज्याला सत्य आणि टीका ऐकायची नसते, या शब्दांत ओवेसी यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये राजकीय फटका बसू शकतो, असे त्यांना वाटले. म्हणूनच केंद्राने कृषी कायदे मागे घेतले. निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे राजकीय नाईलाजानेच त्यांनी हा निर्णय घेतला. तसेच वाढती बेरोजगारी, महागाई असे अजून कटू सत्य देखील पंतप्रधान ऐकतील, अशी मला आशा आहे, असे ओवेसी म्हणाले.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदी