रात्र होताच या गावात आकाशातून होतो दगड गोट्यांचा वर्षाव, नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 19:14 IST2023-08-29T19:14:06+5:302023-08-29T19:14:28+5:30
Chhattisgarh News: छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातील काशीगड गावामधील रहिवासी सध्या खूप त्रस्त झालेले आहेत. या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दगडफेक होत असल्याने गावकरी भीतीच्या छायेत आहेत.

रात्र होताच या गावात आकाशातून होतो दगड गोट्यांचा वर्षाव, नेमकं कारण काय?
छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातील काशीगड गावामधील रहिवासी सध्या खूप त्रस्त झालेले आहेत. या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दगडफेक होत असल्याने गावकरी भीतीच्या छायेत आहेत. या दगडफेकीमध्ये कुठलीतरी अदृश्य शक्ती असल्याचा दावा गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनेकदा गावकऱ्यांनी या घटनेमागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार सक्ती जिल्ह्यातील काशीगड गावामध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून अजब घटना घडत आहेत. अर्धा डझन घरांवर दगडफेक होत आहे. ग्रामस्थांनी सांगितले की आकाशातून दगड विटा बरसत आहेत. या दगडविटा कोण फेकत आहे हे समजत नाही आहे. कुणीही कुणाला दगड फेकताना दिसलेले नाही.
या दगडफेकीच्या घटनेमुळे ग्रामीण भागातील कच्च्या घरांचे छप्पर तुटत आहे. तसेच ग्रामस्थांना दुखापतही होत आहे. या दगडफेकीमुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत आहेत. ग्रामस्थांनी दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी संयुक्तपणे योजना बनवून प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यातून यश आले नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी यामागे कुठल्या तरी अज्ञात शक्तीचा हात असल्याचा दावा करत आहेत. ग्रामस्थांनी दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडेही धाव घेतली होती. मात्र ही दगडफेक कोण करतंय, याचा शोध घेण्यात पोलिसांनाही यश आलेले नाही.
छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यामध्ये मोतीसागर पारा वस्तीमध्ये अशीच एक घटना घडली होती. येथील लोकांनी दगडफेक करणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला पकडता आले नव्हते. मात्र सध्या येथे दगडफेकीची घटना घडलेला नाही.