शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 16:12 IST

...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर थेट निशाणा साधला. ते पंजाबमधील होशियारपूर येथे आज लोकसभा निवडणूक 2024 च्या अखेरच्या सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी 125 दिवसांचा अजेंडाही सांगितला.

काँग्रेस भ्रष्टाचाराची जननी आहे. गेल्या 60 वर्षांत काँग्रेसने जे काही 'कारनामे' केले आहेत, ते पाहून, काँग्रेसने भ्रष्टाचारात डबल पीएचडी केल्यासारखे वाटते. आता असे वाटत आहे की, काँग्रेससोबत आणखी एक कट्टर भ्रष्टाचारी पक्ष जोडला गेला आहे. ते येथे एकमेकांच्या विरोधात लढण्याचे नाटक करत आहेत. दिल्लीत सोबत निवडणूक लढत होते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर थेट निशाणा साधला. ते पंजाबमधील होशियारपूर येथे आज लोकसभा निवडणूक 2024 च्या अखेरच्या सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी 125 दिवसांचा अजेंडाही सांगितला.

काँग्रेस-AAP आघाडीवर हल्लाबोल -पंतप्रधान म्हणाले, ''या खोटारड्या पक्षाचे पहिले सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यानेच दिल्लीत स्थापन झाले होते, हे लोक विसरलेले नाहीत. त्यांनी भ्रष्टाचाराची जननी असलेल्या काँग्रेसकडून भ्रष्टाचाराचे धडे घेतले आहेत. भ्रष्टाचाराची जननी असलेल्या काँग्रेसच्या कुशीतून हे कट्टर भ्रष्टाचारी जन्माला आले आहेत. पंजाब नशामुक्त करू, असे हे लोक म्हणत होते. मात्र त्यांनी नशेलाच आपल्या कमाईचे साधन बनवले. दिल्लीतील दारू घोटाळा संपूर्ण जगाला माहीत झाला आहे. आज संपूर्ण जग दिल्लीपासून पंजाबपर्यंत त्यांचे कारनामे बघत आहे."

125 दिवसांचा अजेंडा -"या निवडणुकीच्या धावपळीतही आपल्या सरकारने एक क्षणही वाया घालवला नाही. सरकार स्थापन होताच, तिसऱ्या टर्ममध्ये पुढील 125 दिवसांत काय होणार, सरकार काय करणार, कसे करणार, कुणासाठी करणार आणि कधीपर्यंत करणार याचा रोड मॅप तयार करण्यात आला आहे. यातही 25 दिवस विशेषतः तरुणांसाठी केंद्रीत करण्यात आले आहेत. पुढील 5 वर्षात कोणते मोठे निर्णय घ्यायचे याबाबतची रूपरेषाही तयार करण्यात आली आहे," असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबBJPभाजपाcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टी