शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 20:22 IST

...यावेळी, राहुल गांधी यांनी आपल्याला कॅमेऱ्यातून काढून टाकल्याची तक्रार सभातींकडे केली. यावर सभापतींनी त्याना एक मिनिट थांबण्यास सांगितले. 

काँग्रेस खासदार तथा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेच्या पहिल्या सत्रात सोमवारी (1 जुलै) सभागृहाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भगवान शिव शंकरांचे चित्र दाखवले. त्यांच्या या कृत्यावर भाजप खासदार भडकले. खरे तर, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना यासंदर्भात आधीच नियम सांगितले होते. यावेळी, राहुल गांधी यांनी आपल्याला कॅमेऱ्यातून काढून टाकल्याची तक्रार सभातींकडे केली. यावर सभापतींनी त्याना एक मिनिट थांबण्यास सांगितले. 

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवल्यावर सभापती ओम बिर्ला म्हणाले, "आपण विरोधी पक्षनेते आहात. सभागृहाची प्रतिष्ठा कायम रहावी आणि नियमांचे पालन व्हावे, अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आपण स्वतः शिव शंकरांना इश्वर मानता आणि अशा प्रकारे येथे त्यांचे वारंवार चित्रिकरण करणे योग्य नाही. तसेच, नियम क्रमांक 349 सांगतो की, सभागृहात झेंडा अथवा कुठलीही वस्तु प्रदर्शित करता येणार नाही.

राहुल गांधी यांनी सभागृहात दाखवला भगवान शिव शंकरांचा फोटो -  यापूर्वीही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत भगवान शिव शंकरांचा आपले प्रेरणास्थान असल्याचे म्हणत, त्यांचा फोटो दाखवत तो फिरवला होता. यावर सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना अडवत नियमावलीच काढली होती. यानंतर, आम्ही शिवजींचा फोटोही दाखवू शकत नाही, आपण मला आडवत आहात, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या अभय मुद्रेचा उल्लेख केला. ते म्हणाले, काँग्रेस अभय मुद्रेत आहे. तसेच, सर्वच धर्माचा उल्लेख करत ते म्हणाले, यांच्यातही 'अभय मुद्रा' दिसते.

यासंदर्भात काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर व्हिडिओ पोस्ट करतत त्याला 'संसदेत कॅमेरा कसा चालतो, बघा जादू', असे कॅप्शन दिले आहे.

शिव शंकरांचा फोटो दाखविण्याचा अर्थ... -यावेळी राहुल गांधी म्हणाले, या सभागृहात भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवायला बंदी आहे. जर मला वाटत असेल की मला त्यांच्याकडून संरक्षण मिळते, तर तुम्ही मला रोखत आहात. याशिवाय माझ्याकडे आणखीही काही फोटो आहेत. मला सर्व फोटो दाखवण्याची इच्छा आहे. संपूर्ण हिंदुस्तानला हे फोटो माहीत आहेत. मी हा फोटो आणला, कारण या फोटोमध्ये आयडिया टू डिफेंड आहे. शिवशंकरांच्या गळ्यात सर्प आहे. याचा अर्थ कुणालाही भुऊ नये. यानंतर राहुल गांधी यांनी गुरु नानक देवांचा फोटो दाखवला आणि गदारोळ सुरू झाला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाom birlaओम बिर्लाcongressकाँग्रेसBJPभाजपा