शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

आमचे सरकार येताच गरिबांची बल्ले बल्ले शेतकऱ्यांना एमएसपीसह कर्जमाफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 13:25 IST

प्रयागराज मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार उज्ज्वल रमण सिंह यांच्या प्रचारार्थ मुंगारी गावात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते.

प्रयागराज : आमचे सरकार येताच सर्व गरिबांची यादी तयार होईल. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यांत आम्ही महिन्याला ८५०० रुपये टाकू. आम्ही शेतकऱ्यांना धान्य, बटाटा, ऊस आणि कापसासाठी किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी देणार आहोत. आम्ही त्यांचे कर्जही माफ करू, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे म्हटले. 

 प्रयागराज मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार उज्ज्वल रमण सिंह यांच्या प्रचारार्थ मुंगारी गावात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते. ते म्हणाले, ही लढाई राज्यघटनेच्या रक्षणाची आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राज्यघटनेवर आक्रमण करत आहेत. कोणतीही शक्ती बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि नेहरू यांच्या राज्यघटनेला मूठमाती देऊ शकत नाही. ही जनतेची राज्यघटना आहे.

बेरोजगार युवकांना देणार १ लाख रुपये, मनरेगाची मजुरी करणार दुप्पटआम्ही बेरोजगार युवकांना दरवर्षी एक लाख रुपये देणार आहोत. अग्निवीर योजना आम्ही कचराकुंडीत फेकू. मनरेगावर काम करणाऱ्यांची मजुरी आणि आशा कार्यकर्त्यांचे मानधन आम्ही दुप्पट करणार आहोत, असेही ते म्हणाले.

हमीभाव देऊ : अखिलेश यादवसमाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही सभेला संबोधित केले. आतापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही. केंद्रातील सरकारच्या काळात एक लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 

शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी काय काय नाही केले गेले. आमचे सरकार येताच शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत मिळेल. ही निवडणूक सामान्य निवडणूक नसून लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. 

एका बाजूला राज्यघटना गुंडाळू पाहणारे ते आणि दुसऱ्या बाजूला राज्यघटना वाचवण्याचा प्रयत्न करणारे आम्ही आहोत. भाजपवाल्यांनी सर्व प्रश्नपत्रिका फोडल्या आणि सर्व स्पर्धा परीक्षा रद्द केल्या. त्यांनी तरुणांचे भविष्य अंधकारमय केले आहे. आम्ही तुम्हाला नोकरीची हमी देतो. आघाडीचे सरकार आल्यास अग्निवीर योजना गुंडाळली जाईल, असेही अखिलेश म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस