शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

"गेल्या ८ वर्षात जेवढे रस्ते निर्माण झाले, तेवढे मागील ६५ वर्षात बनले नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 20:46 IST

गडकरी यांनी रस्ते विकास आणि वाहनांचे यांत्रिकीकरण यासंदर्भात भाष्य केलं. लोकांना वाटतं की, मी सर्वात चांगलं काम रस्ते, बोगदे आणि पूल बनवून केलं आहे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सोमवारी लोकांची मने जिंकली. खराब रस्त्यावरून गडकरींनी लोकांची माफी मागितली आहे. मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असताना गडकरींनी मंडलाच्या खराब रस्त्यावरून लोकांना उद्देशून भाषण करताना, तुम्हाला त्रास झाला, मी माफी मागतो, असे म्हटले. गडकरींच्या स्पष्टवक्तेपणावर नेहमीच चर्चा होत असते. अनेकदा ते आपल्याच पक्षातील काही चुकांवरही जाहीरपणे बोट ठेवताना दिसून आले आहेत. त्यामुळे, त्यांच्या भाषणाचं आणि कामाचं नेहमीच कौतुकही होतं. आता, गडकरींनी एक दावा केला आहे. त्यानुसार, गेल्या ८ वर्षात सर्वाधिक रस्ते देशात बनल्याचं त्यांनी म्हटलंय.  

गडकरी यांनी रस्ते विकास आणि वाहनांचे यांत्रिकीकरण यासंदर्भात भाष्य केलं. लोकांना वाटतं की, मी सर्वात चांगलं काम रस्ते, बोगदे आणि पूल बनवून केलं आहे, पण, या देशात १ कोटीपेक्षा जास्त लोक सायकल रिक्षाने लोकांची वाहतूक करत होते, जी अमानवीय होतं. मात्र, आम्ही यांत्रिकीकरणातून ई-रिक्षा आणून हे काम बंद केलं, असे गडकरी यांनी म्हटले, तसेच, गुजरात विधानसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने केलेल्या घोषणांवरही त्यांनी टीका केली. ज्यांना आपण सत्तेत येणार नाहीत हे माहितीय, ते सध्या काहीही वचनं देत आहेत. घोषणा करण्यात, वचनं देण्यात काही फरक पडत नाही. पण, भाजप जे बोलते ते करुन दाखवते, असेही गडकरींनी म्हटले. काँग्रेसवर निशाणा साधताना, गेल्या ८ वर्षात जेवढे रस्ते निर्माण झाले, तेवढे रस्ते मागील ६५ ते ६६ वर्षांतही देशात बनले नाहीत. मला वाटते की २०२४ पर्यंत देशातील रस्ते वाहतूक सुविधा अमेरिकोबरोबरची असेल, असा दावाही गडकरींनी केला आहे.  

गडकरींनी लोकांची मागितली माफी

मध्य प्रदेशच्या मंडलातील रस्त्यांच्या भूमीपूजन कार्यक्रमाला गडकरी आले होते. यावेळी त्यांच्याकडे जबलपुर-मंडला या ४०० कोटींच्या रस्त्याचे खराब काम झाल्याची तक्रार लोकांनी केली. यावर गडकरींनी जर चूक झाली असेल तर माफीही मागायला हवी. ४०० कोटींचा खर्च करून ६३ किमी लांबीच्या दोन लेनचा रस्ता बनविणे सुरु आहे. मी रस्त्याच्या कामावर खूश नाहीय, असे गडकरी म्हणाले. यानंतर लगेचच गडकरींनी या हायवेचे उर्वरीत काम तात्काळ रोखावे, जुने जे काम झालेय त्याची तातडीने दुरुस्ती करावी, नवीन टेंडर काढून चांगला रस्ता करावा, असे आदेश दिले. याचबरोबर आलेल्या लोकांना त्यांनी तुम्हाला जो त्रास झालाय, त्यासाठी मी माफी मागतो, असे म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूकcongressकाँग्रेसBJPभाजपा