'जोवर राम मंदिर उभारलं जात नाही, तोवर लग्न करणार नाही'! 31 वर्षांपूर्वी घेतली होती शपथ, आता अयोध्येतून आलं विशेष निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 03:34 PM2023-12-21T15:34:49+5:302023-12-21T15:35:26+5:30

कोन आहेत भोजपाली बाबा? ज्यांना आयोध्येतून आलं बोलावणं; मिळालं विशेष निमंत्रण...!

as long as Ram Mandir is not being built, I will not get married The oath was taken 31 years ago by bhojpali baba, now a special invitation came from Ayodhya | 'जोवर राम मंदिर उभारलं जात नाही, तोवर लग्न करणार नाही'! 31 वर्षांपूर्वी घेतली होती शपथ, आता अयोध्येतून आलं विशेष निमंत्रण

'जोवर राम मंदिर उभारलं जात नाही, तोवर लग्न करणार नाही'! 31 वर्षांपूर्वी घेतली होती शपथ, आता अयोध्येतून आलं विशेष निमंत्रण

प्रभू श्रीराम आणि राम मंदिरासाठी (Ram Mandir) उत्कट प्रेम आणि भीष्म प्रतिज्ञेसारखीच एक कहाणी समोर आली आहे. प्रभू श्रीराम यांना आपले आराध्य मानणारे अनेक भक्त आपण बघितले असीतल. मात्र बैतूलमध्ये एक असे महाराज आहेत, ज्यांनी, जोवर अयोध्येत राम मंदिर उभारले जात नाही, तोवर लग्न करणार नाही, असा संकल्प केला होता. या महाराजांचा हा संकल्प 22 जानेवारीला पूर्ण होणर आहे. या महाराजांना अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रणही मिळाले आहे. यामुळे अत्यंतिक आनंदी आहेत. मात्र, वय निघून गेल्याने ते लग्न करणार नाहीत. 

भोजपाली बाबा यांची 'भीष्म प्रतिज्ञा' -
राम मंदिर उभे राहीपर्यंत लग्न करणार नाही, असा संकल्प करणारे बाबा अथवा महाराज सध्या बैतूल येथील मिलानपूरमध्ये राहतात. रविन्द्र गुप्ता अथवा भोजपाली बाबा असे त्यांचे नाव आहे. ते मुळचे भोपाळ येथील आहेत. ते 1992 च्या कारसेवेवेळी अयोध्येतही गेले होते. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षीच हा संकल्प केला होता.

भोजपाली बाबा यांना त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक वेळा लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी बाबा आपल्या संकल्पावर कायम होते. भोजपाली बाबा आता 52 वर्षांचे आहेत. त्यांचा हा संकल्प तब्बल 31 वर्षांनंतर अर्थात 22 जानेवारीला पूर्ण होत आहे. भोजपाली बाबा हे गेल्या 31 वर्षांपासून सनातन धर्माच्या सेवेत आहेत आणि विभिन्न हिंदुत्ववादी संघटनांसोबत काम करत आहेत.

भोजपाली बाबा आता लग्न करणार? -
खरे तर, आता भोजपाली बाबा लग्न करणार नाहीत आणि आपले उर्वरित आयुष्य सनातन धर्मासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्येतून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्याने बाबा अत्यंत आनंदी आहेत. ते आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसोबत जिल्हाभर प्रभू राम चंद्रांच्या नव्या भव्य मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लोकांना पीवळे तांदूळ वाटून आमंत्रित करत आहेत.

Web Title: as long as Ram Mandir is not being built, I will not get married The oath was taken 31 years ago by bhojpali baba, now a special invitation came from Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.