शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

हजारेंच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत केजरीवालांचे मौन पुन्हा जंतरमंतर : विविध शेतकरी संघटनांचा पाठिंबा

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने दिल्लीत मिळविलेल्या अभूतपूर्व यशानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे प्रथमच दिल्लीत आंदोलन करीत असून त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाष्य टाळले आहे.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने दिल्लीत मिळविलेल्या अभूतपूर्व यशानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे प्रथमच दिल्लीत आंदोलन करीत असून त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाष्य टाळले आहे.
हजारे हे केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्याविरुद्ध जंतरमंतरवर २३ फेब्रुवारीपासून दोन दिवसांचे आंदोलन करणार आहेत. केजरीवालांनी त्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली नसली तरी आपचे अन्य नेते कुमार विश्वास यांनी अण्णांनी भेटीची वेळ दिल्यास निश्चितच भेटणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी मोदी सरकारने आणलेल्या या कायद्याविरुद्ध आवाज उठविला होता. अण्णांच्या आंदोलनात विविध शेतकरी संघटना आणि मेधा पाटकर यांच्यासह अनेक नेते सहभागी होत असल्याची माहिती हजारे यांच्या कार्यालयाने दिली आहे.
----------------
चलो दिल्ली
अण्णा हजारे २३ फेब्रुवारी रोजी सकाळी दिल्लीत पोहोचत असून ते हरियाणातील पलवल येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होतील. त्यानंतर शेतकऱ्यांची रॅली दिल्लीला पोहोचेल.
-----------------
कोट
आम्ही अण्णाजींच्या संघर्षाला समर्थन देतो. आम्ही त्यांचा आदर करतो. ते जो आदेश देतील त्याचे मी पालन करेन, तथापि त्यांचा संघर्ष राजकीय पक्षांना दूर ठेवणारा आहे. त्यांनी भेटीची वेळ दिल्यास निश्चितच त्यांची भेट घेईन. प्रत्येकाने त्यांच्या लढ्याला पाठिंबा द्यावा, अशी मी विनंती करीत आहे.
- कुमार विश्वास
आपचे नेते.
--------------
काय आहे भूसंपादन कायदा!
सरकारने गेल्यावर्षी २९ डिसेंबर रोजी वटहुकूम जारी करीत भूसंपादन कायद्यात सुधारणा घडवून आणल्या आहेत. औद्योगिक कॉरिडॉर, पीपीपी प्रकल्प, ग्रामीण पायाभूत प्रकल्प, स्वस्त दरांतील घरे आणि संरक्षण या पाच क्षेत्रांसाठी शेतजमीन ताब्यात घेताना परवानगीची अट काढून टाकण्यात आली आहे.