शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी?
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
4
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
5
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
6
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
7
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
8
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
9
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
10
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
11
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
12
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
13
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
15
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
16
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
17
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
18
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
19
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
20
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

Arvind Kejriwal : "पंतप्रधान मोदी अहंकारी झालेत, स्वतःला घोषित केलं 'देव'"; अरविंद केजरीवालांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 15:04 IST

Arvind Kejriwal And Narendra Modi : अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. "मोदी अहंकारी झाले आहेत. त्यांनी स्वत:च स्वतःला देव घोषित केलं आहे" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत केजरीवालांनी असं म्हटलं आहे. इंडिया आघाडीसाठी प्रचार केला, याचा काही फायदा होईल का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, "गीतेत लिहिलं आहे की, काम करा, फळाची चिंता करू नये. मी प्रचार केला आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे."

पंतप्रधान मोदी महागाईवर बोलत नसल्याचा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केला. "जनतेमध्ये भाजपबद्दल नाराजी आहे. महागाई आणि बेरोजगारीमुळे जनता हैराण झाली आहे. लोकांचा भाजपाबद्दल भ्रमनिरास झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयांवर बोलले नाहीत, उलट ते दोन महिन्यांपासून इकडच्या-तिकडच्या विषयावर बोलत आहेत. ते महाराष्ट्रात शरद पवारांना भटकणारा आत्मा म्हणतात, तर उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचा 'नकली संतान' म्हणतात. या मुद्द्यांवर जनता त्यांना मत देईल का?"

"पंतप्रधान मोदी अहंकारी झाले आहेत"

"पंतप्रधान मोदी आजकाल अहंकारी झाले आहेत. ते म्हणतात की, ते आईच्या उदरातून जन्माला आलेले नसून ते देवाचा अवतार आहेत. त्यांनी स्वत:च स्वतःला देव घोषित केलं आहे. पंतप्रधान मोदींनी २०१४ मध्ये स्वतःला प्रधान सेवक म्हटलं, नंतर २०१९ मध्ये स्वतःला चौकीदार म्हटलं आणि आता २०२४ मध्ये स्वतःला देव घोषित केलं आहे" असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

"अमित शाह यांच्या धमकीला जनताच उत्तर देईल"

पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या जागी राघव चढ्ढा यांना मुख्यमंत्री बनवण्याची चर्चा सुरू आहे? या प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, "गृहमंत्री अमित शाह अशा गोष्टी बोलत आहेत. त्यांनी पंजाबमध्ये जाऊन ४ जून रोजी सरकार पाडून भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार असल्याचं सांगितलं. ७५ वर्षात कोणत्याही गृहमंत्र्यांनी असं विधान केलं असा तुम्ही विचार तरी करू शकता का? अमित शाह यांच्या धमकीला जनताच १ जूनला उत्तर देईल." 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह