शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल यांनी उभा केला नरेंद्र मोदी नावाचा राक्षस - अजय माकन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 09:05 IST

एकीकडे नरेंद्र मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी देशभरात विरोधी पक्षांच्या आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे

नवी दिल्ली -   एकीकडे नरेंद्र मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी देशभरात विरोधी पक्षांच्या आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे दिल्लीमध्ये काँग्रेस आम आदमी पक्षासोबत कोणत्याही प्रकारची आघाडी करणार नसल्याचे दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना माकन यांनी नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच मोदी नावाचा राक्षस उभा करण्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचा मोठा हात असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला.  शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजय माकन यांनी चार ते पाच वेळा मोदींचा उल्लेख राक्षस असा केला. ते म्हणाले,  "अण्णांच्या आंदोलनामध्ये किरण बेदी, बाबा रामदेव, जनरल व्ही, के. सिंह यांच्यासोबत आरएसएस आणि भाजपाच्या पाठबळाच्या जोरावर मोदी नावाच्या राक्षसाला जर कुणी उभे केले असेल तर त्याचे नाव अरविंद केजरीवाल आहे." आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करू शकतो. पण ज्यांनी मोदींसारखा राक्षस उभा केला, असे दिल्ली कार्यकर्त्यांचे मत आहे. अशा लोकांसोबत कशी काय आघाडी होऊ शकते. अण्णांच्या आंदोलनामधून केवळ आणि केवळ काँग्रेसची बदनामी करण्यात आली. या आंदोलनात बी. एस. येडीयुरप्पा, प्रेमकुमार धुमल, प्रकाशसिंह बादल यांच्यावर कोणतीही टीका करण्यात आली नाही. मात्र काँग्रेसवर सातत्याने टीका करून पक्षाला नुकसान पोहोचवले गेले. अशा परिस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते दिल्लीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपसोबत आघाडी करण्यास इच्छुक नाहीत.   

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAAPआपcongressकाँग्रेस