CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 19:55 IST2024-05-08T19:55:00+5:302024-05-08T19:55:40+5:30
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात मुख्यमंत्री कार्यालय उघडण्याची याचिकेद्वारे करण्यात आली होती.

CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
Arvind Kejriwal Delhi High Court: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Keriwal) तिहार तुरुंगात कैद आहेत. अशातच त्यांना तुरुंगातून सरकार चालवण्यासाठी एक ऑफीस उघडण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी करणारी याचिका दिल्लीउच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असून, याचिकाकर्ते वकील श्रीकांत प्रसाद यांना 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
तुरुंगात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्याची मागणी
श्रीकांत प्रसाद यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकामध्ये अरविंद केजरीवालांना तिहार तुरुंगात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करुन द्यावे आमि त्यांच्याविरोधातील बातम्या थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली होती.
मार्शल लॉ लावावा का? - उच्च न्यायालय
दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्याला फटकारत म्हटले की, आता काय मार्शल लॉ लावायचा का? आम्ही मीडियाला त्यांचे विचार प्रसारित करण्यापासून किंवा केजरीवालांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना आंदोलन करण्यापासून रोखू शकत नाहीत. तसेच, केजरीवालांनी ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात आधीच दाखल केली आहे, त्यामुळे अंतरिम सुटकेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल, असेही त्यांनी म्हटले.