शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 15:23 IST

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या घटनेवर अरविंज केजरीवाल यांनी संतत्प प्रतिक्रिया दिली आहे.

Arvind Kejriwal on Baba Siddique Murder : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट) ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दसऱ्याच्या दिवशी(12 ऑक्टोबर 2024) रात्री 9.30 च्या सूमारास बाबा सिद्दिकी यांची त्यांच्या ऑफिसबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेश आणि हरयाणीतील तिघांनी सिद्दिकी यांच्यावर हा गोळीबार केला. दरम्यान, या घटनेवरुन आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले केजरीवाल?"मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याची सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेने महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील लोक भयभीत झाले आहेत. त्यांनी  दिल्लीतही कमी-अधिक प्रमाणात असेच वातावरण निर्माण केले आहे. या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचा आहे. आता जनतेला त्यांच्या विरोधात उभे राहावे लागे," अशी टीका त्यांनी आपल्या पोस्टमधून केली.

गुंड इतके सक्रिय का झाले?तर, दिल्लीचे मंत्री आणि आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनीदेखील या घटनेवरुन प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, "मुंबईत भाजपचे सरकार आहे आणि त्यांच्याच नेत्याची हत्या होते. यावुन तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहू शकता. दिल्लीतही कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. इथेही मुंबईसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही खूप गंभीर बाबत आहे," अशी प्रतिक्रिया सौरभ यांनी दिली.

दिल्ली पोलीस मुंबई पोलिसांना तपासात मदत करणारबाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासात मुंबई पोलिसांना मदत करण्यासाठी दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल मुंबईला जाऊ शकतो. विशेष सेलच्या सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. मुंबई पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी दिल्ली स्पेशल सेलचे पाच जणांचे पथक मुंबईला जाऊ शकते, अशी माहिती आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे गुंडांमधील परस्पर वर्चस्व असण्याची शक्यता सेलला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू केला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या हत्येची जबाबदारी घेतल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.

 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली