"आघाडी नाही, स्वबळावर निवडणूक लढवणार", दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत 'आप'ची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 13:59 IST2024-12-01T13:58:08+5:302024-12-01T13:59:31+5:30

Arvind Kejriwal : आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. 

Arvind Kejriwal makes big announcement ahead of Delhi Assembly Elections, says 'There will be no alliance' | "आघाडी नाही, स्वबळावर निवडणूक लढवणार", दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत 'आप'ची मोठी घोषणा

"आघाडी नाही, स्वबळावर निवडणूक लढवणार", दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत 'आप'ची मोठी घोषणा

Delhi Assembly Elections नवी दिल्ली : नुकत्याच झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यानंतर आता आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षानेही(आप) जोरदार तयारी केली आहे. अशातच आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. 

आम्ही कोणतीही आघाडी करणार नाही. दिल्लीतील सर्व जागांवर आप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे, असे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आघाडीबाबत अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. याचबरोबर, अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील सर्व विधानसभा मतदारसंघात परिवर्तन यात्रा काढण्याच्या भाजपच्या निर्णयावरही भाष्य केले. ते म्हणाले, "भाजपला परिवर्तन यात्रा काढू द्या. लोकशाहीत प्रत्येकाला तसे करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत कोणीही काहीही काढू शकतो."

दरम्यान, फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्लीत विधानसभेच्या एकूण ७० जागांवर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत चौथ्यांदा दिल्लीत सत्तेवर येण्यासाठी आप जोरदार प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, भाजप आणि काँग्रेसचे नेतेही आपच्या विरोधात आक्रमक असून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. तर आठ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले.

तक्रार करणाऱ्यालाच अटक केली - केजरीवाल
याआधी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, उत्तम नगरमधील आमचे आमदार नरेश बाल्यान यांना ३० नोव्हेंबरला अटक करण्यात आली. ते गँगस्टरच्या विरोधात सातत्याने तक्रारी करत होते. आता त्यांच्या मुलाला टार्गेट करण्यात आले आहे. लोकांकडून पैसे घ्या आणि आपल्याला द्या, असे गँगस्टर कपिल सांगवानच्या वतीने सांगण्यात आले होते. या धमकीची तक्रार नरेश बाल्यान यांनी दिल्ली पोलिसांकडे केली होती. त्यांच्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी दिल्ली पोलिसांनी नरेश बाल्यान यांनाच अटक केली.

Web Title: Arvind Kejriwal makes big announcement ahead of Delhi Assembly Elections, says 'There will be no alliance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.