शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

सत्येंद्र जैन यांना अरविंद केजरीवाल का वाचवत आहेत? स्मृती इराणींचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 14:18 IST

Satyendra Jain case: बुधवारी पत्रकार परिषद घेऊन स्मृती इराणी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना चांगलेच घेरले.

नवी दिल्ली :  मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.  सत्येंद्र जैन यांना अटक केल्यानंतर ते मंत्रिपदावर कायम राहण्याबाबत प्रश्न उपस्थित करत स्मृती इराणी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. तसेच, काळ्या पैशाचे मालक सत्येंद्र जैन यांना केजरीवाल का वाचवत आहेत? असा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे. 

बुधवारी पत्रकार परिषद घेऊन स्मृती इराणी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना चांगलेच घेरले. सत्येंद्र जैन हे भ्रष्ट व्यक्ती असून त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी क्लीन चिट दिली आहे. अरविंद केजरीवाल त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का करत आहेत?, सत्येंद्र जैन यांनी 4 शेल कंपनीच्या कुटुंबाच्या मदतीने आणि हवाला ऑपरेटरच्या मदतीने 2010 ते 2016 या काळात मनी लाँड्रिंग केल्याचे अरविंद केजरीवाल नाकारू शकतात का? असे सवाल स्मृती इराणी यांनी केले. तसेच, त्या म्हणाल्या की, सत्येंद्र जैन यांनी मनी लाँड्रिंग केल्याचे खंडपीठाने पुष्टी केली आहे.

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, काल अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, भ्रष्टाचार म्हणजे देशाशी विश्वासघात, मग तुम्ही देशाच्या गद्दारांना आश्रय देत आहात का? न्यायालयाने सत्येंद्र जैन यांची भूमिका जाहीर केल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही का? 2019 मध्ये न्यायालयाने हा आदेश दिला होता, आजवर सत्येंद्र जैन यांच्याकडे काळा पैसा असल्याचे अरविंद केजरीवाल यांना माहीत होते, तरीही अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही? सत्येंद्र जैन यांचा घोटाळा ही अरविंद केजरीवालांची मजबुरी आहे का? दिल्ली उच्च न्यायालय हा राजकीय पक्ष आहे का?, असे सवाल करत स्मृती इराणी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला.

दरम्यान, सत्येंद्र जैन हे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, उद्योग, ऊर्जा, गृह, शहरी विकास आणि पाणी मंत्री आहेत. सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीकडून सोमवारी अटक करण्यात आली आहे. हवाला केस प्रकरणी सत्येंद्र जैन यांची ईडीकडून याआधीपासूनच चौकशी सुरू होती. ईडीने 5 एप्रिल रोजी कारवाई करत त्यांची 4.81 कोटी रुपयांची संपत्ती देखील जप्त केली होती. आता थेट अटकेची कारवाई झाल्याने केजरीवाल सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 

नेमके काय आहे प्रकरण?सत्येंद्र जैन यांनी 2015-16 मध्ये तीन खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून पैसा मिळविल्याचा आरोप आहे. प्रायाज इन्फो सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, अकिनन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मनगलियातन प्रोजक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या शेअरमधून कथितरित्या कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता मिळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच, सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबीयांचे सुद्धा या कंपनांमधून शेअर आहेत. 

मी स्वत: प्रकरणाचा अभ्यास केला, हे पूर्णपणे फेक आहे - केजरीवालसत्येंद्र जैन यांना ईडीने अटक केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. सत्येंद्र जैन यांच्याविरोधातील प्रकरण पूर्णपणे फेक असून राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले होतो. याचबरोबर अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, "तुम्ही पंजाबमध्ये एका राज्यमंत्र्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकले होते ज्याची कोणत्याही तपास संस्थेला किंवा विरोधी पक्षाला कल्पना नव्हती. आम्ही हवं असतं तर ते दडपून टाकू शकलो असतो, पण आम्ही स्वतःहून त्याच्यावर कारवाई सुरू केली आणि त्याला अटक केली. मी स्वत: सत्येंद्र जैन यांच्यावरील खटल्याचा अभ्यास केला आहे. ते प्रकरण पूर्णपणे फेक आहे आणि त्यांना राजकीय कारणांसाठी हेतुपुरस्सर गोवण्यात आले. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. जैन हे सत्याच्या मार्गावर आहेत आणि ते स्वच्छ बाहेर येतील." 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालSmriti Iraniस्मृती इराणीdelhiदिल्ली