रामलीला मैदानाचे नाही, मोदींचे नाव बदला - अरविंद केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 16:25 IST2018-08-25T16:25:04+5:302018-08-25T16:25:16+5:30
रामलीला मैदानाचे नाव बदलून मते मिळणार नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव बदला, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

रामलीला मैदानाचे नाही, मोदींचे नाव बदला - अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली : दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यासाठी उत्तर दिल्ली महानगरपालिकेत प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. रामलीला मैदानाचे नाव बदलून मते मिळणार नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव बदला, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरुन भाजपावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, रामलीला मैदानाचे नाव बदलून अटलबिहारी वाजपेयींचे नाव ठेवल्याने मते मिळणार नाहीत. भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव बदलले पाहिजे. त्यामुळे त्यांना काही मते मिळतील. कारण, त्यांना आपल्या नावावर तर मते मिळत नाही आहेत. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियात काही नेटिझन्सनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
