शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

अरविंद केजरीवालांनी राजीनामा दिल्यावर कोण होणार मुख्यमंत्री? 'या' नेत्यांची नावे चर्चेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 14:46 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Arvind Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी(दि.21) रात्री उशिरा अंमलबजावणी संचालनालयाने(ED) अटक केली. दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लॉड्रिंग प्रकरणात ही अटक झाली आहे. आज त्यांना न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास तुरुंगात जावे लागेल. दरम्यान, केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवतील, असा दावा आम आदमी पक्षाचे सर्व नेते करत आहेत. परंतु, नियमांनुसार हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. अशा परिस्थितीत केजरीवालांना राजीनामा द्यावा लागू शकतो. आता प्रश्न असा पडतो की, जर केजरीवालांना तुरुंगवास झाला, तर त्यांच्या जागी दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार?

केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी मार्लेना, यांनी केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. ते मुख्यमंत्री आहेत आणि राहतील, जेलमधूनच सरकार चालवतील, असे आप नेत्यांचे म्हणने आहे. विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनीही अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तुरुंगवास झाला तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो, अशी कायद्यात तरतूद नाही. पण, तुरुंगातून सरकार चालवल्याचे आतापर्यंत कधीही या देशात घडले नाही.

तुरुंगातून सरकार चालवणे शक्य नाहीतुरुंगाच्या नियमांनुसार, तुरुंगातून सरकार चालवणे सोपे नाही. मुख्यमंत्र्यांचे काम केवळ कागदपत्रे आणि फायलींवर सह्या करणे नसते. मुख्यमंत्री अनेक कामांसाठी जबाबदार असतात. यामध्ये अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे, कॅबिनेट बैठका घेणे आणि ॲडव्होकेट जनरलचा सल्ला घेणे समाविष्ट आहे. तुरुंगात असताना या सर्व गोष्टी व्यावहारिकदृष्ट्या शक्य होत नाहीत. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार?

आपचे तीन नेते तुरुंगात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेपूर्वीच आम आदमी पक्षाचे तीन मोठे नेते तुरुंगात आहेत. आपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, माजी मंत्री सत्येंद्र जैन आणि राज्यसभा खासदार संजय सिंह तुरुंगात आहेत. त्यामुळे आम आदमी पक्षासमोर आधीच नेतृत्वाचे संकट असून, आता अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे अडचण वाढली आहे. दरम्यान, अरविंद काजरीवाल यांना राजीनामा द्यावा लागला, तर दिल्ली सरकारमधील आतिशी मार्लेना, सौरभ भारद्वाज किंवा गोपाल राय, यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री केले जाऊ शकते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय