शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

Arvind Kejriwal: 130 कोटी भारतीयांसोबत युती! अरविंद केजरीवालांनी सांगितला AAPचा 'फ्यूचर प्लान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 14:47 IST

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही 130 कोटी भारतीयांशी युती करणार आहोत. देशातील सामान्य माणूस आपले भविष्य ठरवू शकेल, हे 'आप'चे स्वप्न आहे.

नवी दिल्ली: पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी देशातील राष्ट्रीय राजकारणावर भाष्य केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील युतीबाबत प्रश्न विचारला असता, 'कुठल्याही राजकीय पक्षांशी युती करण्यात रस नाही. आम्ही 130 कोटी भारतीयांशी युती करू इच्छितो', असे केजरीवाल म्हणाले. तसेच, 'द काश्मीर फाईल्स आणि पंतप्रधान मोदींवरही त्यांनी आपले मत व्यक्त केले.

'भाजप नेते पक्षावर नाराज'इंडिया टुडेशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल म्हणाले, 'देशातील सामान्य माणसाने स्वतःचे भविष्य स्वतः ठरवावे, हे आमचे स्वप्न आहे. आपल्या देशात खूप टॅलेंट आहेत, त्यांना फक्त थोड्या पाठिंब्याची गरज आहे.' यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर नौटंकी करत असल्याचा आरोपही केला. त्यांनी पुढे असा दावा केला की भाजप नेते नाखूश आहेत, कारण पक्षाचे केंद्रीय नेतृत्व द काश्मीर फाईल्सचा प्रचार करण्यासाठी त्यांचा वापर करत आहेत.

'काश्मिरी पंडितांना पुनर्वसन हवंय'यावेळी केजरीवालांनी 'द काश्मीर फाईल्स'वरही आपले मत व्यक्त केले आणि 'द काश्मीर फाईल्स चित्रपटाची रक्कम काश्मिरी पंडितांच्या कल्याणासाठी आणि पुनर्वसनासाठी दान करावी', असे म्हटले. ते पुढे म्हणाले की, 'मी काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्या नाही. काश्मिरी पंडितांना चित्रपट नको आहे, त्यांना पुनर्वसन हवे आहे.'

'कोणत्याच पक्षाशी आमचे वैर नाही'ते पुढे म्हणाले की, 'केंद्रात आमचे सरकार असते तर मी तुम्हाला (काश्मिरी पंडितांना) खात्री देतो की तुमच्यावर चित्रपट बनवण्याऐवजी तुमचा हात धरून तुम्हाला काश्मीरमधील तुमच्या घरी सोडले असते. यावेळी पीएम मोदींवर टोमणा मारण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी त्यांना (पीएम मोदी) टोमणा का मारेल? ते देशाचे पंतप्रधान आहोत. मी इथे भाजप, काँग्रेस, मोदीजी, सोनिया किंवा राहुल गांधी यांच्या विरोधात नाही. मी फक्त देशाचा विचार करतो.' 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाcongressकाँग्रेस