शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

आसाम रायफल्सने घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला, NSCN-KYA संघटनेचे तीन माओवादी चकमकीत ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 15:13 IST

ठार झालेल्या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

इटानगर:अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालिम(NSCN-KYA) च्या तीन माओवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. 6 आसाम रायफल्सच्या सैनिकांनी चकमकीनंतर लाँगडिंग परिसरात या माओवाद्यांना कंठस्नान घातलं. माओवाद्यांविरोधात कारवाई अजूनही सुरुच आहे. दरम्यान, ठार झालेल्या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या माओवाद्यांनी दोन नागरिकांचे अपहरण करुन म्यानमारला नेलं आहे. त्या नागरिकांचा शोध सध्या सुरू आहे. या वर्षी जुलैमध्येही तिरप पोलिसांसह आसाम रायफल्सच्या खोन्सा बटालियनच्या पथकाने सुरू केलेल्या विशेष संयुक्त कारवाईत याच गटातील दोन सदस्य ठार झाले होते. नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड आणि त्‍यांच्‍या सर्व संस्‍था आणि आघाडीच्‍या संघटनांवर बेकायदेशीर कृत्य कायदा, 1967 अंतर्गत बंदी घालण्‍यात आली आहे.

मणिपूरमधील हल्ल्याचा बदला

मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात म्यानमार सीमेवर पीपल्स लिबरेशन आर्मी(PLA) आणि मणिपूर नागा पीपल्स फ्रंट(MNF) च्या दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सचे कर्नल, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि चार जवानांना गोळ्या घालून ठार केलं होतं. त्या हल्ल्यानंतर दोन दिवसांनी NSCN-KYA चे माओवादी मारले गेले आहेत. अशाप्रकारे आसाम रायफल्सने आपल्या कर्नलच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे.

अनेक नेत्यांकडून भ्याड हल्ल्याचा निषेधसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आसाम रायफल्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल पीसी नायर आणि इतर अनेक नेत्यांनी त्या हल्ल्याचा निषेध केला. संरक्षण मंत्री म्हणाले, मणिपूरच्या चुराचंदपूर येथे आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेला भ्याड हल्ला अत्यंत क्लेशदायक आणि निषेधार्ह आहे. देशाने कर्नल आणि त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांसह 5 शूर सैनिक गमावले आहेत. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. दोषींना लवकरच न्याय मिळवून दिला जाईल.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशnaxaliteनक्षलवादीterroristदहशतवादीPoliceपोलिस