शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Xiaomi च्या वेदर अ‍ॅपवरून अरुणाचल प्रदेश गायब, वाद वाढल्यावर कंपनीने दिलं असं उत्तर

By बाळकृष्ण परब | Updated: October 19, 2020 14:19 IST

Xiaomi Weather App Arunachal Pradesh News: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने असल्याने सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचे तणावाचे वातावरण आहे. या तणावाच्या वातावरणादरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ठळक मुद्देचिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या Xiaomiच्या मोबाइल फोनमुळे निर्माण झाला हा वाद शाओमी च्या मोबाइलमधील वेदर अ‍ॅपवर अरुणाचल प्रदेश दिसत नसल्याने या वादाला फुटले तोंड शाओमीच्या वेदर अ‍ॅपमध्ये अरुणाचल प्रदेश दिसत नसल्याने सोशल मीडियावर चर्चेस झाली सुरुवात

नवी दिल्ली - चिनी सैन्याचा लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने असल्याने सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचे तणावाचे वातावरण आहे. या तणावाच्या वातावरणादरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या Xiaomiच्या मोबाइल फोनमुळे हा वाद निर्माण झाला आहे. शाओमी च्या मोबाइलमधील वेदर अ‍ॅपवर अरुणाचल प्रदेश दिसत नसल्याने या वादाला तोंड फुटले आहे.शाओमीच्या वेदर अ‍ॅपमध्ये अरुणाचल प्रदेश दिसत नसल्याने सोशल मीडियावर चर्चेस सुरुवात झाली. तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाशी या प्रकाराचा संबंध नेटीझन्सकडून जोडण्यात येत आहे. पूर्वोत्तर भारतातील राज्य असलेल्या अरुणाचल प्रदेशवर चीनकडून सातत्याने दावा करण्यात येत असतो. तसेच चीनकडून अरुणाचल प्रदेशबाबत वारंवार कुरापती काढण्यात येत असतात.दरम्यान, सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचा तणाव असतानाचा हा प्रकार समोर आल्याने सोशल मीडियावर संतापाचा वातावरण निर्माण झाले. शाओमीच्या वेदर अ‍ॅपमध्ये अरुणाचल प्रदेश दिसत नसल्याने Boycott Xiaomi चा ट्रेंड सुरू झाला. शाओमी कंपनी आपल्या अ‍ॅपमध्ये जाणीवपूर्वक अरुणाचल प्रदेश दाखवत नसल्याचा आरोप नेटिझन्सनी केला.तसेच शाओमी च्या वेदर अ‍ॅपमध्ये अरुणाचल प्रदेश दिसत नसल्याचे स्क्रीन शॉट पोस्ट करण्यात येऊ लागले. तर अन्य स्मार्टफोन कंपन्यांच्या डिव्हाइसमध्ये मात्र अरुणाचल प्रदेश दिसत होता.दरम्यान, या सर्व वादावर शाओमी ची प्रतिक्रिया समोर आली आहे. चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या या कंपनीने हा प्रकार म्हणजे सॉफ्टवेअर ग्लिच असल्याचे सांगितले. शाओमी स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेले वेदर अ‍ॅप हे मल्टिपल थर्ड पार्टी डेटा सोर्सकडून डेटा कलेक्ट करते, असा दावा कंपनीने केला. त्यामुळे या अ‍ॅपमध्ये अनेक ठिकाणांसाठीचा डेटा उपलब्ध होत नाही, असे कंपनीने म्हटले आहे.

 

 

टॅग्स :xiaomiशाओमीchinaचीनIndiaभारतArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशindia china faceoffभारत-चीन तणावMobileमोबाइल