अरुणाचल बातमी
By Admin | Updated: February 20, 2016 00:34 IST2016-02-20T00:34:50+5:302016-02-20T00:34:50+5:30
अरुणाचलच्या मुख्यमंत्रीपदी कालिखो पुल

अरुणाचल बातमी
अ ुणाचलच्या मुख्यमंत्रीपदी कालिखो पुलइटानगर: काँग्रेसचे बंडखोर नेते कालिखो पुल यांनी शुक्रवारी रात्री अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल के.पी. राजखोवा यांनी राजभवनावर त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. पुल यांच्या सरकारला ११ भाजपा आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे. यापुर्वी अर्थ आणि आरोग्य खाती सांभाळणार्या पुल यांची काँग्रेसचे बंडखोर आमदार, भाजपा आमदार तसेच दोन अपक्ष आमदारांनी १७ डिसेंबर रोजी विधिमंडळाच्या एका कामचलाऊ सभागृहात सभागृह नेतेपदी निवड केली होती.