शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

त्याच्या शरीरावर 70-80 जखमा, शत्रूसुद्धा एवढा रानटी नसतो- अरुण जेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 15:44 IST

केरळच्या दौ-यावर असलेल्या अरुण जेटलींनी संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या करणा-या कथित कम्युनिस्टांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

तिरुवनंतपूरम, दि. 6 - केरळच्या दौ-यावर असलेल्या अरुण जेटलींनी संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या करणा-या कथित कम्युनिस्टांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे आमचं मनोबल आणखी वाढणार आहे. कोणताही हल्ला हे कोणाची विचाराधारा संपवू शकत नाही, असंही जेटली म्हणाले आहेत. राजेश शरीरावर 70-80 जखमा होत्या, शत्रूसुद्धा एवढा रानटी नसतो, असं म्हणत जेटलींनी हल्लेखोरांवर आगपाखड केली आहे.  गेल्या काही काळापासून आरएसएसच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येच्या मुद्द्यावर भाजपा स्वतःचे राजकीय विरोधक सीपीएमविरोधात आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. भाजपानं सर्व वरिष्ठ नेत्यांना केरळच्या रणांगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या रणनीतीअंतर्गतच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली केरळमध्ये दाखल झाले आहेत. जेटलींनी तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा हत्या करण्यात आलेल्या संघाचे कार्यकर्ते राजेश यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी त्यांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. सीपीएम कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या संघाच्या कार्यकर्त्यांच्या घरालाही अरुण जेटलींनी भेट दिली आहे.केरळ राज्यातील परिस्थिती समजून घेण्यासाठी अरुण जेटलींना मोदींनी पाठवल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक काळापासून सत्ताधारी कम्युनिस्ट आणि आरएसएस व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार उफाळून येतोय. केंद्र सरकारचा हा निर्णय संघाच्या कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवणार आहे. संघानं राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा हवाला देताना राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर जेटलींच्या दौ-याला महत्त्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीसह अनेक राज्यांत सत्ता मिळवल्यानंतर आता त्यांनी स्वतःचं लक्ष्य केरळवर केंद्रित केलं आहे. देशातील अनेक राज्यांत सत्ता हस्तगत केल्यानंतर भाजपानं आता केरळकडे मोर्चा वळवला आहे. उत्तर भारतात हातपाय पसरलेल्या भाजपानं आता दक्षिणेकडे कूच केली आहे.