शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कृत्रिम बुद्धिमत्तेची 'सोफिया' बॉलिवूडच्या किंग खानची चाहती !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 11:51 PM

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचे जगभरात अनेक चाहते असतील. मात्र, या चाहत्यांमध्ये शाहरुख खानची एक खास चाहती आहे. ती म्हणजे सोफिया. कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेली ती जगातील पहिली चालती-बोलती रोबो आहे. 

हैदराबाद : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचे जगभरात अनेक चाहते असतील. मात्र, या चाहत्यांमध्ये शाहरुख खानची एक खास चाहती आहे. ती म्हणजे सोफिया. कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेली ती जगातील पहिली चालती-बोलती रोबो आहे. हैदराबादमध्ये आयटी वर्ल्ड कॉंग्रेसच्या कार्यक्रमात मंगळवारी सोफिया दाखल झाली होती. या कार्यक्रमात प्रश्नांना उत्तरे देताना तिने शाहरूख खान आपला बॉलिवूडमधील आवडता अभिनेता असल्याचे सांगितले. यावेळी तिच्या या उत्तरानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उपस्थितांनी सोफियाचे कौतुकही केले.

सोफिया नेमकी कोण?धातूचे तुकडे आणि तारांपासून बनलेली एक रोबो आहे. विचार करायची क्षमता असलेली, निर्णय क्षमता असलेली, कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेली चालती-बोलती रोबो असून तिला सोफिया असे नाव देण्यात आले आहे. सौदी अरेबियाने सोफियाला नागरिकत्व बहाल केले आहे. एखाद्या रोबोला नागरिकत्व देणारा सौदी अरेबिया जगातला पहिला देश आहे. हाँगकाँगच्या हॅनसन रोबॉटिक्सने सोफियाची निर्मिती केली आहे. माणसांप्रमाणेच सोफिया आपल्या भावना व्यक्त करू शकते.

 सोफियाचा लग्नाला नकार! मुंबईतील एका आयोजित कार्यक्रमात सोफियाला येथील निवेदिकेने असे विचारले होते की, समजा मी पुरुष आहे आणि तुला लग्नाची मागणी घातली तर तुझी प्रतिक्रिया काय असेल? त्यावर सोफिया स्मित हास्य करीत म्हणाली, मी नम्रपणे नकार देईन. मात्र तुमच्या ‘प्रपोज’बद्दल धन्यवाद !.  

टॅग्स :SophiaसोफियाRobotरोबोट