शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
2
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
3
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
5
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
6
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
7
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
8
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
9
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
10
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
11
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
12
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
13
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
14
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
15
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
16
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
17
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
18
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
19
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार

अनुच्छेद ३७० हा भारताचा अंतर्गत प्रश्न : युरोपियन युनियन शिष्टमंडळाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:22 IST

आम्ही त्यांच्याशी शांततेच्या कल्पनांची देवाणघेवाणही केली.’ या शिष्टमंडळातील अनेक संसद सदस्य हे उजव्या किंवा अति उजव्या पक्षांचे असून, ते त्यांच्या देशांतील मुख्य प्रवाहाचे भाग नाहीत.

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या भेटीवर असलेल्या युरोपियन युनियनच्या संसद सदस्यांनी घटनेतील ३७० वा अनुच्छेद रद्द करण्याचा निर्णय हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईत आम्ही त्याच्या बाजूने आहोत, असे सांगितले.या संसद सदस्यांची ही भेट वादग्रस्त ठरली व विरोधी पक्षांनी भेटीवर टीकाही केली होती. युरोपियन पार्लमेंटच्या २३ सदस्यांचे शिष्टमंडळ मंगळवारी दोन दिवसांच्या भेटीवर काश्मीर खोऱ्यात येताच दुकाने बंद होती व चकमकीही झडल्या. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पश्चिम बंगालमधील सहा स्थलांतरित मजुरांच्या केलेल्या हत्येचा शिष्टमंडळाने निषेध केला. ‘आम्ही जर अनुच्छेद ३७० बद्दल बोलणार असू, तर तो भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. जगभर ज्याचा उपद्रव वाढला आहे त्या दहशतवादाबद्दल आम्हाला काळजी वाटते आणि दहशतवादाशी लढणाºया भारतासोबत आम्ही उभे ठाकले पाहिजे. सहा निष्पाप मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केली ही दुर्दैवी घटना असून, आम्ही तिचा निषेध करतो,’ असे फ्रान्सचे हेन्री मॅलोसी यांनी सांगितले.

मॅलोसी हे युरोपियन इकॉनॉमिक अ‍ॅण्ड सोशल कमिटीचे माजी अध्यक्ष आहेत. ते म्हणाले, ‘आम्हाला लष्कर आणि पोलिसांकडून तसेच तरुण कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली. आम्ही त्यांच्याशी शांततेच्या कल्पनांची देवाणघेवाणही केली.’ या शिष्टमंडळातील अनेक संसद सदस्य हे उजव्या किंवा अति उजव्या पक्षांचे असून, ते त्यांच्या देशांतील मुख्य प्रवाहाचे भाग नाहीत. ही भेट सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली. या भेटीसाठी पैसा कोणी दिला याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले. एका अशासकीय संस्थेने (एनजीओ) ही भेट आयोजित केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिष्टमंडळाशी भेट घालून देण्याचे आश्वासनही दिले गेल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली होती.नवी दिल्ली : युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाच्या काश्मीर खोºयाच्या भेटीनंतर आणखी विदेशी शिष्टमंडळे जम्मू आणि काश्मीरच्या भेटीवर येणार आहेत. काश्मीर खोºयातील परिस्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी विदेशांच्या अधिकृत प्रतिनिधींच्या शिष्टमंडळांना तेथे भेट देण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Indiaभारत