कला महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर
By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30
अभोणा : येथील डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वच्छ भारत अभियान विशेष श्रमसंस्कार शिबिराचे दि. २४ ते ३० डिसंेबर या कालावधीत ढेकाळे येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य पी. व्ही. देशपांडे यांनी दिली.

कला महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर
अ ोणा : येथील डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वच्छ भारत अभियान विशेष श्रमसंस्कार शिबिराचे दि. २४ ते ३० डिसंेबर या कालावधीत ढेकाळे येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य पी. व्ही. देशपांडे यांनी दिली. शिबिराचे उद्घाटन दि. २४ रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बीडकर असतील. प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब मराठे, डॉ. विजय बीडकर, शेखर जोशी, ढेकाळेच्या सरपंच ललिताताई वाघ, पोलीसपाटील भाऊराव चौबे, मुख्याध्यापक संजय शिंदे, प्रवीण कापडणीस आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिबिराचा समारोप दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत होईल. या श्रमशिबिरात दररोज दुपारी ३ ते ५ यावेळेत ॲड. मनोज सूर्यवंशी, संजय सोनवणे, प्रा. आर. एम. पगार, तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा, सहायक पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सचिन मुठे, गटविकास अधिकारी मधुकर शिरसाठ, गटशिक्षण अधिकारी बी. डी. चव्हाण यांची व्याख्याने होतील.