शिवरायांच्या पालखीचे आज आगमन
By Admin | Updated: July 11, 2015 00:15 IST2015-07-11T00:15:19+5:302015-07-11T00:15:19+5:30
शिवरायांच्या पालखीचे आज आगमन

शिवरायांच्या पालखीचे आज आगमन
श वरायांच्या पालखीचे आज आगमनपुणे : मराठी माणसाच्या मनात शक्ती व भक्तीचा समन्वित जागरण करण्यासाठी शक्तीपंढरी दुर्गेदुर्गेश्वर रायगड ते भक्तिपंढरी पंढरपूर अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची पायी पालखीचे रायगडहून प्रस्थान झाले. या पालखीचे शनिवारी पुण्यात आगमन होणार आहे. त्यावेळी पहिले शस्त्र रिंगण पेरूगेट भावे शाळेच्या मैदानावर दुपारी २ ते ४ यावेळेत रंगणार आहे. पुढे ही पालखी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत पंढरपूरला जाणार आहे. पालखीत १०७ युवक व धारकरी सहभागी झाले आहेत. महाराजांच्या पादुका डोक्यावर घेवून पालखीचे प्रस्थान झाले आहे. पहिल्यादाच पुण्यात होत असलेल्या शस्त्र रिंगणात पखवाज व टाळांच्या गजरात तलवारबाजी, दांडपे फिरविण्यात येणार आहेत. ---