CoronaVirus News: राहुल गांधींनीदेखील तोच सवाल विचारला; प्रोफाईल फोटो बदलला, सरकारला थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 15:55 IST2021-05-16T15:52:04+5:302021-05-16T15:55:14+5:30
CoronaVirus News: दिल्लीत पोस्टर प्रकरणात पोलिसांकडून १७ जणांना अटक; राहुल गांधी आक्रमक

CoronaVirus News: राहुल गांधींनीदेखील तोच सवाल विचारला; प्रोफाईल फोटो बदलला, सरकारला थेट आव्हान
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात दिल्लीत लावण्यात आलेल्या पोस्टर्समुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २१ एफआयआर दाखल केल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत १७ जणांना अटक केली आहे. यापैकी काहींना जामीन मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवरून काँग्रेसनं पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधीदेखील तेच पोस्टर शेअर केलं आहे. त्यामुळे आता यावरून वातावरण तापलं आहे.
मलादेखील अटक करा, असं राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबत राहुल यांनी वादग्रस्त पोस्टरचा फोटोदेखील ट्विट केला आहे. त्यांनी हेच पोस्टर आता प्रोफाईल फोटो म्हणून ठेवलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनीदेखील हेच पोस्टर प्रोफाईल फोटो म्हणून ठेवलं आहे. पंतप्रधान मोदींना थेट सवाल विचारणारं पोस्टर लावल्याप्रकरणी पोलिसांनी कलम १८८ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Arrest me too.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2021
मुझे भी गिरफ़्तार करो। pic.twitter.com/eZWp2NYysZ
प्रकरण नेमकं काय?
दिल्लीतल्या विविधा भागांमध्ये पोस्टर लावण्यात आल्याची माहिती गुरुवारी रात्री पोलिसांना मिळाली. मोदीजी, तुम्ही आमच्या मुलांसाठीच्या लसी परदेशांत का पाठवल्या? असा मजकूर त्या पोस्टरवर होता. हे पोस्टर कुठे छापण्यात आले, कोणाच्या सांगण्यावरून ते दिल्लीत लावले गेले, याचा शोध दिल्ली पोलीस घेत आहेत. पूर्व दिल्ली, उत्तर दिल्ली, मध्य दिल्ली, रोहिणी आणि द्वारका परिसरात हे पोस्टर लावण्यात आले होते.