मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन

By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:00+5:302015-06-12T17:38:00+5:30

आरपीआयचा इशारा

Arrange rosewood animals, otherwise the movement | मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन

पीआयचा इशारा
दौंड : शहरात मोकाट कुत्रे आणि जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे बंदोबस्त करावा अन्यथा दौंड नगर परिषदे समोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांना देला आहे.
शहरातील भाजी मंडई, गांधी चौक, जुन्या तहसील कचेरी समोर बैल, वळु यासह छोटी छोटी जनावरे रस्त्यावर अस्तव्यस्त बसलेली असतात. यामुळे वाहतुकीला त्रास होतो. बर्‍याचदा ही जनावरे रस्त्यावरुन सुसाट पळत सुटतात. त्यामुळे रस्त्यावर ये जा करणार्‍या लोकांना ही जनावरे धडकून नागरिक जखमी होत आहेत. भाजी मंडई, शालिमार चौक या परिसरात असणार्‍या चिकन मार्केटमुळे कुत्र्यांचा संचार वाढलेला आहे. त्यातच शालीमार चौक ते शहीद भगतसिंग चौक या परिसरात कोंबडयांची पिसे खराब मासांची तुकडे रस्त्याच्या कडेला अस्तव्यस्त टाकलेली असतात परिणामी कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे. त्यामुळे रस्त्यावरुन येणार्‍या जाणार्‍या नागरिकांच्या अंगावर तसेच दुचाकींवर ही कुत्री धावून जातात. परिणामी, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरी या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर रवि कांबळे, विकास कदम, भारत सरोदे, प्रकाश भालेराव, नागेश साळवे, राजाभाऊ जोगदंड यांच्या स‘ा आहेत.


चौकट

* नाराजी आणि नाराजी
दौंड शहरात बाहेर गावावरुन सर्रासपणे बेवारस कुत्रे वाहनांमध्ये आणून सोडण्याचे प्रकार वाढत आहेत. दौंडच्या ग्रामीण भागातील तसेच पुणे-बारामती येथील उपद्रवी कुत्री पकडली जातात. ही कुत्री सोडण्यासाठी दौंड शहर सोईचे असल्याने दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. बाहेर गावावरुन कुत्रे घेऊन येणार्‍यांवर टेहाळणी ठेवुन त्या व्यक्तींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पुणे जिल्हा आरपीआयचे सरचिटणीस विकास कदम यांनी केली आहे.


फोटो : दौंड शहरात नदीकाठी मातीच्या ढिगार्‍यात कुत्रे अस्तव्यस्त झोपलेले असतात माणसाच्या चालण्याची चाहुल लागताच हे कुत्रे सर्रासपणे माणसांच्या अंगावर येऊन चावा घेतात. (छाया: मनोहर बोडखे)


12062015-िं४ल्लि-07
------------------

Web Title: Arrange rosewood animals, otherwise the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.