शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

विमानात पुन्हा अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा समोरासमोर आले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 19:12 IST

चार विमान कंपन्यांकडून कुणाल कामरावर प्रवास बंदी

नवी दिल्ली: पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केल्यानं कॉमेडियन कुणाल कामरावर इंडिगोनं सहा महिने प्रवास बंदी घातली. यानंतर आज पुन्हा एकदा कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी विमानात आमनेसामने आले. कुणालनं याबद्दलची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. लखनऊहून परतताना पुन्हा एकदा अर्णब गोस्वामी मला विमानात भेटले होते, अशी माहिती कुणालनं ट्विट करुन दिली. तत्पूर्वी काल लखनऊला जाताना गोस्वामी आणि कुणाल समोरासमोर आले होते. त्यावेळी कुणालनं अर्णब यांना त्यांच्या पत्रकारितेबद्दल प्रश्न विचारले. तुम्ही अतिशय भित्रे आहात, असल्याचं कुणालनं अर्णब यांना म्हटलं होतं. मात्र अर्णब यांनी कुणालच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं. यानंतर इंडिगोनं कुणालवर सहा महिने प्रवास बंदी घालत असल्याचं जाहीर केलं.  काल झालेल्या या प्रकारानंतर आज पुन्हा एकदा अर्णब आणि कुणाल आमनेसामने आले. 'मी सकाळी लखनऊहून परतत असताना अर्णब माझ्याच विमानात होते. तुम्ही माझ्यासोबत चर्चा कराल का, असा प्रश्न मी त्यांना अतिशय नम्रपणे विचारला. मात्र त्यांनी फक्त हातानं इशारा करत मला तिथून जाण्यास सांगितलं. त्यानंतर मी तिथून बाजूला झालो,' अशी माहिती कुणालनं सकाळी ट्विट करुन दिली आहे.  प्रवाशासोबत गैरवर्तन केल्यानं इंडिगोनं कुणालवर सहा महिन्यांची बंदी घातली आहे. यानंतर एअर इंडिया, स्पाईसजेट, गो एअर, एअर इंडियानंदेखील कुणालवर बंदी घालत असल्याचं जाहीर केलं. तर एअर एशिया इंडिया, विस्तारा यांच्याकडून या प्रकरणाचा आढावा घेतला जात आहे. या घटनेबद्दल सोशल मीडियात संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीIndigoइंडिगोGoAirगो-एअरAir Indiaएअर इंडियाspicejetस्पाइस जेट