Army Recruitment: सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहत असाल तर..! महत्वाचा निर्णय; भरती सुरु होणार पण सूट मिळणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 16:59 IST2022-06-03T16:59:15+5:302022-06-03T16:59:23+5:30
Army Recruitment: देशात गेल्या तीन वर्षांपासून स्थगित झालेली सैन्य भरती लवकरच सुरू होऊ शकते. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी तसे संकेत दिले आहेत.

Army Recruitment: सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहत असाल तर..! महत्वाचा निर्णय; भरती सुरु होणार पण सूट मिळणार नाही
नवी दिल्ली: देशात गेल्या तीन वर्षांपासून स्थगित झालेली सैन्य भरती लवकरच सुरू होऊ शकते. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी तसे संकेत दिले आहेत. दून येथे मीडियाशी बोलताना संरक्षण राज्यमंत्र्यांनी सांगितले की, कोविडची परिस्थिती सुधारताच सैन्यात भरती केली जाईल. कोविडचा संसर्ग कमी झाला आहे, परंतु पूर्णपणे नाहीसा झाला नाही. कोविडमुळे तरुणांना भरतीसाठी वयात सवलत मिळणार नाही, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.
संरक्षण राज्यमंत्र्यांच्या मते, देशात 11 क्षेत्रीय भर्ती कार्यालये, दोन भर्ती डेपो, एक स्वतंत्र भर्ती कार्यालय आणि 70 सैन्य भर्ती कार्यालये आहेत. यापैकी दरवर्षी 90 ते 100 भरती मेळावे घेतले जातात. सन 2018-19 मध्ये लष्करात 53431, नौदलात 5885 आणि हवाई दलात 6862 सैनिकांची भरती झाली, तर 2019-20 मध्ये लष्करात 80572, नौदलात 6068 आणि हवाई दलात 7222 सैनिकांची भरती झाली. परंतु 2020 नंतर सैनिकांची भरती झालेली नाही.
मात्र, 2020-21 मध्ये नौदलातील 2772 सैनिक आणि हवाई सेवेतील 8423 सैनिकांची भरती करण्यात आली. त्याचप्रमाणे 2021-22 मध्ये नौदलात 5547 सैनिक आणि हवाई दलात 4609 सैनिकांची भरती करण्यात आली. संरक्षण राज्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, लष्करातील सैनिकांची भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असली, तरी यानंतरही लष्करी यंत्रणा प्रत्येक स्पर्धेसाठी पूर्णपणे सज्ज आहे.
सूट देण्याच्या प्रश्नावर म्हणाले...
कोरोनामुळे भरतीसाठी वयोमर्यादेत सूट देण्याच्या प्रश्नावर मंत्री म्हणाले की, तरुणांना भरतीसाठी शिथिलतेची गरज नाही. आर्मी जीडीमध्ये भरतीसाठी वयोमर्यादा साडेसतरा ते 21 वर्षे आहे. तांत्रिक पदांसाठी साडेसतरा ते 23 वर्षे, तर जेसीओसाठी 21 ते 27 वयोगटातील तरुणांना घेतले जाते. याशिवाय शिक्षण हवालदाराची वयोमर्यादा 20 ते 25 वर्षे आहे.