शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
2
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
3
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
4
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
5
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
6
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
7
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
8
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
10
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
11
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
12
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
13
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
14
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
15
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
16
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
17
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
18
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
19
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
20
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार

कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 06:21 IST

‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या शौर्य आणि संयमाचे प्रतीक म्हणून इतिहासात नोंदले जाईल, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या शौर्य आणि संयमाचे प्रतीक म्हणून इतिहासात नोंदले जाईल, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क  राहावे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

जैसलमेर येथे भारतीय लष्कराच्या वरिष्ठ कमांडरांशी संवाद साधताना ते म्हणाले की, संरक्षण दलांनी माहिती युद्ध, आधुनिक संरक्षण पायाभूत सुविधांची निर्मिती आणि आधुनिकीकरण या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे भविष्यातील आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाता येईल. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे  लष्करी सामर्थ्याचे प्रतीक आहे. ही केवळ लष्करी कारवाई नव्हती तर ते देशाच्या धैर्य आणि संयमाचे प्रतीक होते.

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जैसलमेर येथील बैठकीत ‘ग्रे झोन वॉरफेअर’ आणि संयुक्त लष्करी कार्यक्षमतेसाठी तयार केलेल्या आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली. या परिषदेला सीडीएस अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरमधील निर्णयप्रक्रिया स्थानिकांकडे 

जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द झाल्यानंतर तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कराने बजावलेल्या भूमिकेचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, कलम ३७० रद्द करणे हा ऐतिहासिक निर्णय होता. जम्मू-काश्मीरमधील निर्णयप्रक्रिया आता स्थानिक लोकांच्या हाती आहे. या सर्व बदलांमध्ये लष्कराने त्या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. चीनबरोबर सुरू असलेला संवाद आणि तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांनी भारताची संतुलित आणि ठाम परराष्ट्र नीती अधोरेखित केली आहे.

रोबोट श्वान, ड्रोनच्या मदतीने  युद्धसराव

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात भारत-पाक सीमेच्या जवळ भारतीय लष्कराच्या ‘थार शक्ती’ युद्धसरावाचा आढावा घेतला. त्यात शेकडो लष्करी जवानांनी वाळवंटातील प्रगत लढाऊ कौशल्ये आणि युद्धक्षमता यांचे दर्शन घडविले. 

या सरावात रोबोटिक खेचर, ड्रोन, रोबोट श्वा आदींचा समावेश होता. राजनाथसिंह यांनी सीमेवरील ऐतिहासिक तनोट माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि अन्य अधिकारी होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Always be vigilant, never underestimate the enemy: Rajnath Singh

Web Summary : Defense Minister Rajnath Singh emphasized vigilance and modernizing defense capabilities during his visit to Jaisalmer. He lauded 'Operation Sindoor' as a symbol of courage and highlighted the army's role in restoring peace in Jammu & Kashmir after the revocation of Article 370. He also reviewed the 'Thar Shakti' exercise.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरRajnath Singhराजनाथ सिंह