लष्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांचा जवानांनी केला खात्मा

By Admin | Updated: May 14, 2017 21:32 IST2017-05-14T21:22:12+5:302017-05-14T21:32:23+5:30

हंदवाडा येथे जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं आहे.

Army Lashkar-e-Toiba terrorists killed | लष्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांचा जवानांनी केला खात्मा

लष्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांचा जवानांनी केला खात्मा

ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 14 - हंदवाडा येथे जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं आहे. हंदवाडाच्या वारीपोरा भागामध्ये लष्कर आणि दहशवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. वारीपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिल्यानंतर जवानांनी दहशवाद्यांविरोधात शोधमोहीम राबवली होती.

या शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांना शोधून त्यांचा कंठस्नान घालण्यात आलं आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू असतानाच अचानकपणे जवानांवर गोळीबार करण्यात आला. त्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. जवानांच्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. हंदवाडाच्या जंगलात आणखी दहशतवादी लपल्याची शक्यताही वर्तवण्यात आली असून, लष्करानं दहशतवाद्यांविरोधातील शोधमोहीम तीव्र केली आहे.

लष्करानं खात्मा केलेले दहशतवादी हे पाकिस्तानमधल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीदरम्यान दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रही हस्तगत करण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी काश्मीरला लक्ष्य करत आहेत. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांना टार्गेट केल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. त्यामुळे काश्मीरमधल्या हंदवाडा परिसरात सुरक्षेचे कडे उभारण्यात आले आहेत.

Web Title: Army Lashkar-e-Toiba terrorists killed