गोळीबार करून ३४ लाखांची लूट एसटी बसवर सशस्त्र दरोडा : कुरिअर कर्मचार्‍यावर वार

By Admin | Updated: September 16, 2015 23:38 IST2015-09-16T23:38:07+5:302015-09-16T23:38:07+5:30

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे आणि अतीतच्या दरम्यान ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या एसटी बसवर मंगळवारी रात्री सशस्त्र दरोडा पडला. पिस्तुलीतून गोळीबार करून दहशत निर्माण करणार्‍या चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी बसमधील कुरिअर कर्मचार्‍याजवळील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे ३४ लाखांचा ऐवज लंपास केला. या वेळी कुरिअर कर्मचार्‍यावर धारदार शस्त्राने वारही करण्यात आले.

Armed robbery on the ST bus by looting 34 lakhs! | गोळीबार करून ३४ लाखांची लूट एसटी बसवर सशस्त्र दरोडा : कुरिअर कर्मचार्‍यावर वार

गोळीबार करून ३४ लाखांची लूट एसटी बसवर सशस्त्र दरोडा : कुरिअर कर्मचार्‍यावर वार

तारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे आणि अतीतच्या दरम्यान ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या एसटी बसवर मंगळवारी रात्री सशस्त्र दरोडा पडला. पिस्तुलीतून गोळीबार करून दहशत निर्माण करणार्‍या चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी बसमधील कुरिअर कर्मचार्‍याजवळील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे ३४ लाखांचा ऐवज लंपास केला. या वेळी कुरिअर कर्मचार्‍यावर धारदार शस्त्राने वारही करण्यात आले.
बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागठाण्यापासून पुढे निसराळे फाट्याजवळ असणार्‍या सिमरनजित ढाब्यावर हे थरारनाट्य घडले. आजर्‍याहून (जि. कोल्हापूर) बोरिवलीला (मुंबई) निघालेली एसटी बस मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास या ढाब्यावर जेवणासाठी थांबली. हा ढाबा महामार्गाजवळील सेवारस्त्यालगत आहे. बसमधून गोपीनाथ तानाजी कदम (३०, रा. मालगाव, ता. सातारा) हे प्रवास करीत होते. ते कोल्हापूरच्या तिरूपती कुरिअरचे कर्मचारी आहेत. ढाब्यालगत असलेल्या स्नॅक्स सेंटरमधून वडापाव घेऊन कदम बसमध्ये बसले.
त्यांच्या पुढे दोघे जण, तर मागून दोघेजण बसमध्ये चढले. पुढील दोघांनी कदम यांच्यावर पिस्तूल रोखले, तर मागील दोघांपैकी एकाने त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. इतर दोघांनी कदम यांच्या दोन बॅगा ताब्यात घेतल्या. कदम यांनी घ˜ धरून ठेवलेली बॅग ताब्यात घेण्यासाठी एकाने त्यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार केला. बॅगा ताब्यात येताच दरोडेखोर बसमधून खाली उतरले. दरोडेखोरांनी हिसकावलेल्या दोन बॅगांमध्ये २३ लाखांची रोकड होती. याखेरीज ९ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १० किलो ६०० ग्रॅम वजनाचे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने या बॅगेत होते. तेथे दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी एक गोळी झाडली. नंतर सेवारस्त्यावरून त्यांची इनोव्हा गाडी कोल्हापूर दिशेने सुसाट गेली. (प्रतिनिधी/वार्ताहर)

Web Title: Armed robbery on the ST bus by looting 34 lakhs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.