कंपन्या लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचं, फॉरेन टुरचे आमिष देत असतात. कर्मचारी हे मिळवण्यासाठी कष्ट करुन टारगेट पूर्ण करतात. सध्या सर्वच क्षेत्रात टारगेट पूर्ण करण्यासाठी कंपन्या आमिष देत असल्याचे पाहायला मिळते, सध्या अशाच एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. टारगेट पूर्ण करण्याच्या नादात तब्बल ३७ लोकांना तुरूंगात जावे लागले.
सध्या असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशमधून समोर आले आहे. येथील एका कृषी कंपनीच्या एरिया मॅनेजरने भन्नाट ऑफर दिली. या ऑफरमुळे ३७ लोक तुरुंगात पोहोचले. ऋषिकेश येथील गंगा भोगपूर तल्ला येथे असलेल्या एका रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झाल्यानंतर या लोकांना पकडण्यात आले. पोलिसांनी ९ महिला डान्सर्ससह ३७ जणांना अटक केली आहे. मॅनेजरने खत विकून चार कोटी रुपयांचे टारगेट पूर्ण करण्यासाठी दुकानदार आणि वितरकांना आकर्षित करण्याकरिता या रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते.
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
टारगेट पूर्ण केले तर रेव्ह पार्टी...
ऋषिकेशमधील गंगा भोगपूर तल्ला येथील एका रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्टीचा भंडाफोड झाला. यानंतर पोलिसांनी ९ महिला डान्सरसह ३७ जणांना अटक केली. खते विकून ४ कोटी रुपयांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी दुकानदार आणि वितरकांना आमिष दाखवण्यासाठी मॅनेजरने रेव्ह पार्टी आयोजित केली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रेव्ह पार्टीचा आयोजक मनोज कुमार आहे, तो मेरठ, यूपी येथील मवाना येथील रहिवासी आहे. तो पश्चिम यूपीमधील एका कृषी कंपनीत एरिया मॅनेजर आहे. तो मेरठ, मुझफ्फरनगर, गाझियाबाद, हापूर आणि बुलंदशहर येथे कंपनीचे काम पाहतो. कंपनीने त्याला खतांच्या विक्रीसाठी पावसाळ्यात ४ कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य दिले होते, हे साध्य करण्यासाठी कंपनीच्या दुकानदारांना आणि वितरकांना लोकप्रिय पॅकेज देऊन रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती.
या पार्टीमध्ये मुझफ्फरनगर आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील इतर ठिकाणांहून खत विकणाऱ्या दुकानदारांना आणि वितरकांना बोलावण्यात आले होते.
बंदी असूनही, रिसॉर्ट सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, एसडीएम यमकेश्वर यांनी १ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स बंद ठेवण्याचे निर्देश दिले. असे असूनही, गंगा भोगपूर तल्ला येथील हरिद्वार-बॅरेज चिला रोडवर असलेल्या इवाना रिसॉर्टचे काम सुरू होते. या रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती.