Are you a customer of Indane gas? Gas cylinder booking number changed | इंण्डेनचे ग्राहक आहात का? गॅस सिलिंडर बुकिंगचा नंबर बदलला; जाणून घ्या...

इंण्डेनचे ग्राहक आहात का? गॅस सिलिंडर बुकिंगचा नंबर बदलला; जाणून घ्या...

आज अगदी खेड्यापाड्यात घरोघरी गॅसवर अन्न शिजविले जाते. केंद्र सरकारची उज्ज्वला योजना यासाठी खूप महत्वाची होती. गॅस सिलिंडर देणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. यापैकीच एक आहे ती इंण्डेन गॅस (Indane gas). या गॅस कंपनीने गॅस सिलिंडर बुकिंगचा नंबर बदलला आहे. 


देशातील प्रमुख ऑईल मार्केटिंग कंपनी इंडेनने सोमवारी एलपीजी ग्राहकांसाठीचा नवीन नंबर जाहीर केला आहे. आता यापुढे जुन्या नंबरवरून गॅस बुक करता येणार नाही. या नंबरचा वापर देशभरातील ग्राहक करू शकणार आहेत. आयव्हीआर आणि एसएमएसद्वारे सिलिंडर बुक करता येतो. यासाठी वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळे नंबर होते. ते रद्द करून कंपनीने पूर्ण भारतभरासाठी एकच नंबर जारी केला आहे. याचा अर्थ देशभरातील ग्राहकांना 7718955555 या नंबरवर कॉल किंवा एसएमएस (SMS) करून सिलिंडर बुक करावा लागणार आहे. 


सुत्रांनी सांगितले की, कंपनीचे ग्राहक आता कोणत्याही वेळी य़ा नंबरवरून सिलिंडर बुक करू शकणार आहेत. कॉल करून सिलिंडर बुक करायचा असल्यास य़ा नंबरवर रजिस्टर्ड नंबरवरून कॉल करावा लागणार आहे. किंवा एसएमएस करावा लागणार आहे. फोन केल्यानंतर योग्य पर्याय निवडावा लागणार आहे. एसएमएससाठी एका फॉर्मेटमध्ये एक मेसेज करावा लागणार आहे. तुर्तास नवीन प्रणाली असल्याने कंपनीकडून ग्राहकांना सवलत मिळण्याचीही शक्यता आहे. 


व्हॉट्सअॅपवरूनही बुक करता येणार
सध्या खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणावर ग्राहकांशी जोडण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता इंण्डेनही वापरणार आहे. व्हॉट्सअॅपवरूनही सिलिंडर बुक करता येणार आहे. यासाठी तुम्हाला रजिस्टर नंबरवरून 7588888824 वर व्हॉट्सअॅपद्वारे रिफिल (REFILL) टाईप करून ते पाठवावे लागणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Are you a customer of Indane gas? Gas cylinder booking number changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.