शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

होय, मी आयपीएलवर सट्टा लावला; अरबाज खानची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2018 1:13 PM

5 वर्षांपासून बुकी सोनू जालानच्या संपर्कात असल्याची माहिती अरबाजनं पोलिसांना दिली

ठाणे: आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याची कबुली बॉलीवूड अभिनेता अरबाज खान यानं दिली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अरबाज खानची चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान आयरपीएल सामन्यांवर बेटिंग केल्याची कबुली अरबाजनं दिली. याशिवाय 5 वर्षांपासून बुकी सोनू जालानच्या संपर्कात असल्याची माहितीदेखील त्यानं पोलिसांना दिली आहे. 

आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेता अरबाज खानची ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. अटकेत असलेला बुकी सोनू योगेंद्र जलाल (४१, रा. मालाड, मुंबई) याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाजला आज चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ठाणे पोलिसांनी बजावली होती.

जलालकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाजने क्रिकेटच्या अनेक सामन्यांवर त्याच्याकडे सट्टा लावला होता. आतापर्यंत दोन कोटी ८० लाखांचा सट्टा तो हरला आहे. काही दिवस त्याने पैसे दिले. मात्र, काही रक्कम त्याने दिलीच नाही. राहिलेली रक्कम मागण्यासाठी जलालने अरबाजकडे तगादा लावला होता. त्यासाठी वारंवार त्यांचे फोनवरून आणि मध्यस्थांमार्फत बोलणेही झाले. पण अरबाज त्याला प्रतिसाद देत नव्हता. याचप्रकरणी जलालने त्याला धमक्याही दिल्या होत्या. सोशल मीडियावर अरबाज जलाल यांचे फोटोही व्हायरल झाले होते. जलालच्या मोबाइलमध्येही काही बुकी तसेच अरबाजचे फोटो जलालसोबत आहेत. देशभरातील ९८ सट्टेबाज जलालच्या संपर्कात असल्याची माहिती यापूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाच्या चौकशीत उघड झाली होती. २७ मे रोजी आयपीएल क्रिकेटचा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध हैदराबाद सुपरकिंग्ज असा शेवटचा सामना होता. याच सामन्यावर सट्टा लावण्यासाठी देशभरातील ९८ बुकी जलालच्या संपर्कात होते. ही माहिती त्याच्याच साथीदारांकडून मिळाल्यावर पोलिसांनी त्याला २९ मे रोजी अटक केली. 

टॅग्स :IPLआयपीएलArbaaz Khanअरबाज खानSalman Khanसलमान खान