नवी दिल्ली- आशियातील दोन्ही बाजूंनी कार्यरत राहू शकणारा सर्वात मोठा 'झोजी ला' खिंड बोगदा बांधण्यास केंद्र सरकारच्या कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. या बोगद्याला ६,०८९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे श्रीनगर व लेह या प्रवासासाठी लागणारा वेळ साडेतीन तासांवरून १५ मिनिटांवर येणार आहे.हा बोगदा १४.२ किमी लांबीचा असून त्याच्यामुळे श्रीनगर, कारगिल, लेह यांच्यातील वाहतूक वर्षभर अखंड राहणार आहे. अन्यथा हिवाळ्यात बर्फवृष्टीनंतर त्यांच्यामधील संपर्क तुटतो. या समस्येवर हा बोगदा उत्तम तोडगा होऊ शकतो. पंतप्रधान नेतृत्व करत असलेल्या आर्थिक विषयक कॅबिनेट समितीने या बोगद्याच्या कामाला आज हिरवा कंदील दाखवला.
लेह-श्रीनगर केवळ 15 मिनिटांत, आशियातील सर्वात मोठ्या बोगद्याला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 21:50 IST