शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

मंत्रालयांमधील सचिवांच्या रिक्त जागी केल्या नियुक्त्या ; प्रमुख पदांवर नवे सचिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 2:21 AM

अरविंद सिंग पर्यटन मंत्रालयाचे नवे सचिव

हरीश गुप्ता नवी दिल्ली : सचिवांची रिक्त असलेली पदे भरण्यात आली असून, मध्यप्रदेशातील आयएएस अधिकारी दीपक खांडेकर यांची कार्मिक विभागात नवे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते अजय भल्ला यांची जागा घेतील. भल्ला यांच्याकडे गृहसचिवपदासह कार्मिकचा पदभार होता. डॉ. सी. चंद्रमौळी हे निवृत्त झाल्यापासून भल्ला हे काही महिन्यांपासून दुहेरी जबाबदारी सांभाळत होते.काही महिन्यांपासून सचिवपदे रिक्त होती. कार्मिक मंत्रालय हे थेट पीएमओच्या अंतर्गत येते. नियुक्त्या, बदल्यांशी ते संबंधित आहे. खांडेकर  हे यापूर्वी आदिवासी विभागाच्या मंत्रालयात सचिव होते.

अन्य एका महत्त्वाच्या बदलांमध्ये सुखबीरसिंग संधू यांना सचिवपदावर पदोन्नती देण्यात आली आहे, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कायम राहतील. बिद्युत बिहारी स्वाइन हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या मंत्रालयाचे नवे सचिव असतील. ते ए.के. शर्मा यांची जागा घेतील. शर्मा यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे आणि ते आता उत्तर प्रदेशातून विधान परिषदेवर सदस्य झाले आहेत. हे दोन्ही विभाग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अंतर्गत येतात. उपेंद्र प्रसाद सिंग (वस्त्रोद्योग), राजेश के. चतुर्वेदी (खते), योगेंद्र त्रिपाठी (रसायन आणि खते), आलोक कुमार (वीज) आणि आलोक टंडन (खाण), तसेच जी.व्ही. वेणुगोपाल सरमा हे रासायनिक शस्त्रे, राष्ट्रीय प्राधिकरणाचे नवे अध्यक्ष  असतील, तर पंकज कुमार जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाचे काम पाहणार आहेत.

प्रवीण श्रीवास्तव हे कॅबिनेट सचिवालयाचे सचिव (समन्वय), तर अरविंद सिंग हे १९८८ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी पर्यटन मंत्रालयाचे नवे सचिव असतील. अलका तिवारी या राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या नव्या सचिव असतील. प्रवीण श्रीवास्तव हे कॅबिनेट सचिवालयाचे सचिव (समन्वय), तर अरविंद सिंग हे १९८८ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी पर्यटन मंत्रालयाचे नवे सचिव असतील. अलका तिवारी या राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या नव्या सचिव असतील.