शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

Twitter : ट्विटरकडून विनय प्रकाश यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 11:53 IST

Twitter : RGO ची नेमणूक करण्याबरोबरच कंपनीने 26 मे 2021 ते 25 जून 2021 या कालावधीतील कंप्लायंस रिपोर्टही प्रकाशित केला आहे.

 नवी दिल्ली : मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने (Twitter) विनय प्रकाश (Vinay Prakash) यांची भारतात तक्रार निवारण अधिकारी (RGO) म्हणून नियुक्ती केली आहे. यासह ट्विटरने भारतात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याचा स्थानिक पत्ताही दिला आहे. जर कोणाला संपर्क करायचे असेल तर ते भेटू देखिल शकतात. (twitter appoints vinay prakash as its resident grievance officer)

ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, विनय प्रकाश यांचा ईमेल आयडी grievance-officer-in@twitter.com आहे. तसेच, त्यांचे कार्यालय कर्नाटकच्या बंगळुरू येथील स्टेट बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर आहे. ट्विटरने म्हटले आहे की, ट्विटरला भारतात 'चौथा मजला, द इस्टेट, 121 डिकेंसन रोड, बंगळुरू 560042' येथे संपर्क साधला जाऊ शकतो. ही माहिती कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे.

दरम्यान,  अलीकडेच माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरच्या नवीन माहिती तंत्रज्ञानाविषयी (आयटी) नियमांबद्दल केंद्र सरकारकडे केलेल्या अडचणीवर म्हटले होते की, जे लोक भारतात राहतात आणि काम करतात त्यांना देशाच्या नियमांचे पालन करावे लागेल.

कंप्लायंस रिपोर्टही प्रकाशित RGO ची नेमणूक करण्याबरोबरच कंपनीने 26 मे 2021 ते 25 जून 2021 या कालावधीतील कंप्लायंस रिपोर्टही प्रकाशित केला आहे. आयटी नियमांनुसार, हा आणखी एक महत्त्वाचा नियम होता जो 26 मे रोजी अस्तित्वात आला. यापूर्वी ट्विटरने धर्मेंद्र चतूर यांना आपला अंतरिम अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. मात्र, धर्मेंद्र चतुर यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता. 

दरम्यान, सोशल मीडियाच्या नवीन नियमांबाबत भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात संघर्ष सुरु आहे. 8 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, आयटीच्या नव्या नियमांबाबत केंद्र सरकारकडे अडचणीचा सामना करत असलेल्या ट्विटरने कोर्टाला सांगितले की, त्याने अंतरिम मुख्य अनुपालन अधिकारी नेमले आहेत, जे भारताचे रहिवासी आहेत.

याचबरोबर, ट्विटर नियमांनुसार आठ आठवड्यांत या पदासाठी नियमित अधिकारी नेमण्याचा प्रयत्न करतील. यासंदर्भात कोर्टाने मायक्रोब्लॉगिंग साइटला नवीन नियमांचे पालन केल्याबद्दल अमेरिकेतील नोटरीने सत्यापित असलेले प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास दोन आठवड्यांचा कालावधी दिला.

टॅग्स :Twitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया