हातकणंगलेत पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल

By Admin | Updated: February 3, 2017 00:58 IST2017-02-03T00:19:59+5:302017-02-03T00:58:46+5:30

हातकणंगले : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या बुधवारी पहिल्याच दिवशी २४ टोप पंचायत समितीच्या सर्वसाधारण मतदारसंघात शिवसेनेकडून तानाजी बाबूराव पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला.

Application for nominations for the first day in Hathkangala | हातकणंगलेत पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल

हातकणंगलेत पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल

हातकणंगले : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या बुधवारी पहिल्याच दिवशी २४ टोप पंचायत समितीच्या सर्वसाधारण मतदारसंघात शिवसेनेकडून तानाजी बाबूराव पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला.
हातकणंगले तालुक्यात पहिल्याच दिवशी शिवसेनेने हातात भगवे झेंडे घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करून ढोलताशाच्या ठेक्यात टोप पंचायत समिती मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य महेश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अर्ज दाखल करण्याच्या ऑनलाईन पद्धतीमुळे इच्छुकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. अर्ज ऑनलाईन भरून त्याची मूळ कॉपी सर्व विवरणासह निवडणूक अधिकारी यांच्याकडे सोपवावी लागणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी फक्त सहा दिवस असून, एक दिवस गेला असून, राहिलेल्या फक्त पाच दिवसांमध्ये सर्व शासकीय आणि स्वत:ची माहिती उमेदवारी अर्जासोबत द्यावी लागणार असल्याने उमेदवारांची दमछाक सुरू आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Application for nominations for the first day in Hathkangala