Kerala Floods : ‘अॅपल’ आणि बिल गेट्सने केली केरळच्या पूरग्रस्तांना मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 15:53 IST2018-08-26T15:39:43+5:302018-08-26T15:53:13+5:30
Kerala Floods : अॅपलने ही केरळच्या पूरग्रस्तांना 7 कोटींची मदत देण्याचे जाहीर केले आहे.

Kerala Floods : ‘अॅपल’ आणि बिल गेट्सने केली केरळच्या पूरग्रस्तांना मदत
तिरुअनंतपुरम - मुसळधार पावसाने केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. केरळमधील पूरप्रकोपात आतापर्यंत 350 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 2 लाख नागरिक बेघर झाले आहेत. केरळमध्ये 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळच्या पूरग्रस्तांना जगभरातील लोकांनी मदतीचा हात दिला आहे. अॅपलने ही केरळच्या पूरग्रस्तांना 7 कोटींची मदत देण्याचे जाहीर केले आहे. घरे, शाळा यांच्या पुर्नबांधणीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला हा निधी देण्यात येत असल्याचे अॅपलने सांगितले आहे.
आर्थिक मदतीसोबतच अॅपलने आपले होम पेज, अॅपस्टोअर, आयट्यून स्टोअर याठिकाणी केरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. डेबिट आणि क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ग्राहक 5, 10, 25, 50, 100 आणि 200 डॉलरची मदत करु शकतात. तसेच याआधी बिल गेट्स यांच्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे केरळच्या पूरग्रस्तांना 4 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आर्थिक मदत ही युनिसेफला पाठविली जाणार असून केरळमधील लोकांचे लवकर पुर्नवसन व्हावे या उद्देशाने हा निधी देत असल्याचं फाऊंडेशननं म्हटलं आहे.