Appeal to Modi's public, 'Send notification to app for speech of Independence Day' | ‘स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी अ‍ॅपवर सूचना पाठवा’, मोदींचे जनतेला आवाहन
‘स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी अ‍ॅपवर सूचना पाठवा’, मोदींचे जनतेला आवाहन

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण करणार असलेल्या भाषणात कोणकोणते मुद्दे असावेत यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून सूचना मागविल्या आहेत. लोकांनी आपल्या मनात असलेल्या संकल्पना, विचार नमो अ‍ॅपमधील ओपन फोरमवर कळवावेत असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
१५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षी पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून जनतेला उद्देशून भाषण करतात. त्या प्रथेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनाच्या यंदाच्या वर्षीच्या भाषणात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदी यांनी शुक्रवारी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, लोकांच्या मनात असलेले विचार, संकल्पना देशातील १३० कोटी जनतेसमोर जावेत असे वाटत आहे. मोदी यांच्या या टिष्ट्वटला ५ हजार लोकांनी लाइक तर एक हजार जणांनी रिटिष्ट्वट केले आहे.


Web Title: Appeal to Modi's public, 'Send notification to app for speech of Independence Day'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.